ग्रामपंचायतीची कामे होणार आॅनलाइन, आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 07:04 AM2018-03-09T07:04:57+5:302018-03-09T07:04:57+5:30

केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत.

Gram panchayat work will be done online, optical cable connectivity | ग्रामपंचायतीची कामे होणार आॅनलाइन, आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

ग्रामपंचायतीची कामे होणार आॅनलाइन, आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

Next

- आविष्कार देसाई
अलिबाग - केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायती आॅप्टिकल केबलने जोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असतानाच रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीमधील बहुतांश संगणक बंद पडलेले आहेत. त्यामुळे १ एप्रिलपासून ग्रामपंचायतींचे सर्व व्यवहार आॅनलाइन पध्दतीने कसे होणार हाच मोठा प्रश्न आहे.
भारताच्या प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण भारत देश संगणकाने जोडण्याचा संकल्प केला आहे. डिजिटल इंडिया या नावाने सुरु झालेली ही मोहीम देशाच्या ग्रामीण भागातील कानाकोपºयात पोचवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनाही घरबसल्या सर्व व्यवहार करणे शक्य व्हावे, तसेच ग्रामपंचायतीमधील प्रशासकीय कारभाराला गती यावी यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंर्तगत महानेट फॅसिलेशन सुविधा देण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील ८०६ ग्रामपंचायतींमधील संगणक इंटरनेटने जोडण्यात येत आहेत. त्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये इंटरनेटचे जाळे निर्माण करणे गरजेचे आहे. भारतनेट अभियानातर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. काही भागांमध्ये केबल टाकण्याचे काम सुरु आहे तर, काही ठिकाणी अद्याप होणे बाकी आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमधून ही आॅप्टिकल फायबरची केबल जाणार आहे तेथील संबंधित ग्रामपंचायतींनी बीएसएनएल व्यवस्थापनाला ना हरकत प्रमाणपत्र तातडीने देणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही काही ग्रामपंचायतींना ते न दिल्यामुळे कामाला पाहिजे तशी गती येताना दिसत नाही.
डिजिटल इंडियाचे स्वप्न प्रत्यक्षात योग्य त्या मुदतीमध्ये लवकरात लवकर साकार व्हावे यासाठी केंद्राकडून सातत्याने दबाव येत असल्याने प्रशासनाने याबाबत गंभीरता दर्शवली आहे. त्याचाच भाग म्हणून माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष तथा प्रधान सचिव यांनी राज्यातील ज्या जिल्हा परिषदांमध्ये भारतनेट अभियान राबवण्यात येत आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना १८ जानेवारी २०१८ रोजी पत्र लिहून कामाचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पत्राचा आधार घेत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील विस्तार अधिकाºयांना आदेश देत कामे पूर्ण करण्याच्या सूचना, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठेवण्यासाठी २०० चौरस मीटरची जागा देणे, तसेच आॅप्टिकल केबल टाकण्यासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र ४८ तासांच्या आत बीएसएनएलला द्यावे असे आदेश दिले आहेत.

डिजिटल इंडियाचा नारा

भारत संचार निगम लिमिटेडच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार


रायगड जिल्ह्यामध्ये भारत फेस-२ अंतर्गत महानेट फॅसिलेशन सुविधा

भारतनेट अभियानांतर्गत ग्रामीण भागांमध्ये आॅप्टिकल फायबरची केबल टाकण्याच्या कामाला सुरुवात

च्अलिबाग तालुक्यातील काही संगणक बंद पडलेले असल्यामुळे ते सर्व बंद पडलेले संगणक पंचायत समितीच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहेत.
च्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतीमधील संगणक बंद अवस्थेत असल्यामुळे तेथील कर्मचाºयांना सायबर कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे.
च्संगणक बंद पडलेले असतानाच १ एप्रिलपासून रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे प्रशासकीय व्यवहार आॅनलाइन पध्दतीने केले जाणार आहेत. त्यामुळे हे कसे शक्य होणार हाच मोठा प्रश्न आहे.

ग्रामपंचायतींमधील बंद पडलेले संगणक हे दुरुस्त होऊ शकतात. त्यानुसार ते दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे. तसेच ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना आदेशही देण्यात आले आहेत. १ एप्रिलपासून आॅनलाइन व्यवहार सुरु केले जातील.
- प्रकाश खोपकर,
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

१० ग्रा.पं मध्ये संगणक सेवा
च्श्रीवर्धन, मुरुड,खालापूर आणि म्हसळा या विभागातील प्रत्येकी १० ग्रामपंचायतींमध्ये संगणक सेवा सुरु झाली आहे. बीएसएनएलने सुरुवातीला काही दिवस मोफत सेवा दिली होती. आता प्रत्येक ग्रामपंचायतींना इंटरनेट वापरण्याबाबतचे पॅकेज निवडावे लागणार आहे. त्यानुसारही कार्यवाही सुरु असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सांगितले.

Web Title: Gram panchayat work will be done online, optical cable connectivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.