ग्रामपंचायत निवडणूक : दासगाव, वीर, वहूर निवडणूक शांततेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 06:51 AM2017-10-17T06:51:23+5:302017-10-17T06:51:56+5:30

ग्रामपंचायत सर्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये दासगांव वहूर आणि वीर या तीन ग्रामपचांयतीसाठी सोमवारी मतदान झाले. दासगावंमध्ये ११ सदस्य पदासाठी २५ वहूरमध्ये १० सदस्य पदासाठी

 Gram panchayat elections: Dasgaon, Veer, Bahur, Election peace | ग्रामपंचायत निवडणूक : दासगाव, वीर, वहूर निवडणूक शांततेत  

ग्रामपंचायत निवडणूक : दासगाव, वीर, वहूर निवडणूक शांततेत  

Next

दासगांव : ग्रामपंचायत सर्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये दासगांव वहूर आणि वीर या तीन ग्रामपचांयतीसाठी सोमवारी मतदान झाले. दासगावंमध्ये ११ सदस्य पदासाठी २५ वहूरमध्ये १० सदस्य पदासाठी २० आणि वीरमध्ये २ सदस्य पदासाठी ४ असे एकूण ४९ अर्जदाखल झाले होते. सोमवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यत वीरमध्ये ५४.५३ टक्के, दासगांव मध्ये ७१.९९ टक्के तर वहूरमध्ये ५७.६९ एवढे टक्के मतदान झाले असून उमेदवारांचे भवितव्य ईलेक्ट्रानिक मशीनमध्ये बंद झाले आहे.
दासगांव आणि वहूर या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी ५ अर्ज दाखल झाले असून वीर ग्रामपंचायतीचे सरपंच पद गाव पातळीवर बिनविरोध झाले आहे. तीन्ही ग्राम पंचायती मध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
ग्रामपंचायत सर्वागिक निवडणूक २०१७ मध्ये दासगांव वीर आणि वीर यातीन ग्रामपंचयायतीचा समावेश होता. दासगांवमध्ये ४ प्रभागासाठी ११ सदस्य वहूर मध्य ४ प्रभागासाठी ११ सदस्य तर वीर मध्ये ३ प्रभागासाठी ७ सदस्य अशी निवडणूक होती. वीरमध्ये ५ तर वहूरमध्ये एक सदस्य गाव पातळीवर बिनविरोध झाला होता उर्वरित पदासाठी सोमवारी निवडणूक झाली. सरपंच पदाला अधिकार वाढल्यामूळे सरपंच पदाची निवडणूक चुरशीची होतीव वीरमध्ये सरपंच पद बिनविरोध झाले. शिवसेना आणि काँग्रेस असे तुल्य बळ पक्षाचा लढाईत सहभाग असल्यास निवडणूकीचे वातावरण थोडे गंभिरच झाले होते. दासगांव मध्ये सरपंच पदासाठी तीन तर वहूर मध्ये सरपंच पदासाठी दोन अर्ज दाखल झाले होते.
वीरमध्ये दोन प्रभागात झालेल्या निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज भरले गेले होते. एकूण मतदान ९४८ एवढे होते ५१७ मतदारांनी आपला अधिकार बजावला वीर मध्ये ५४.५३ एवढे मतदान झाले.दासगांवमध्ये सदस्य पदासाठी २५ उमेदवारी अर्ज भरले गेले होते तर तीन सरपंच पदासाठी एकूण मतदान २८६७ एवढे होते. २०६४ मतदारांनी आपला अधिकार बजावला ७१.९९ एवढ मतदान झाले. दासगांवमध्ये सोमवारी निवडणूक असल्याकारणाने बुथ अधिकाºयांसह सर्व टीम रविवारी संध्याकाळी मतदान केंद्रावर दाखल झाली होती. रविवारी रात्री दासगांव बामण कोंड मराठी शाळेवर निवडणुकीचे कर्तव्य बजावण्यासाठी गेले असता मध्यरात्री मतदान केंद्र अध्यक्ष सुधीर मांडवकर यांना डोक्याजवळ विंचवाचे दर्शन घडले यामुळे त्यांच्या सह सोबतच्या सर्व अधिकाºयांची रात्र जागून काढावी लागली. याच बुथ वर शिपाईची नेमणूक असलेले गंगेश मनवे हे निवडणूक बुथ परिसरात सकाळी पाय घसरुन पडले. यावेळी त्यांना दुखापत झाली. या दोन घटनांमुळे निवडणुकीसाठी आलेल्या अधिकाºयामध्ये घबराहटीचे वातावरण निर्माण झाले होते.

वीरमध्ये ५४.५३ टक्के, दासगांव मध्ये ७१.९९ टक्के तर वहूरमध्ये ५७.६९ एवढे टक्के मतदान झाले.
तिन्ही ठिकाणी शांततेत मतदान झाले.
च्चोख पोलीस बंदोबस्त होता.

मतदारांना प्रलोभन दाखविणाºयांवर गुन्हा दाखल

१महाड : महाड तालुक्यातील आडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक लढविणाºया एक उमेदवाराविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याबरोबरच त्याचा जाहिरनामा प्रकाशित करणारा प्रकाशक आणि एका प्रिंटींग प्रेस चालकाविरोधात देखील हा गुन्हा दाखल झाला आहे.

२मधुकर बाळा महाडीक (रा. डोंगरोली, पो. आडी, ता.महाड) असे गुन्हा दाखल झालेल्या उमेदवाराचे नाव आहे. त्याने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात गावातील सर्व नागरिकांची पुढील पाच वर्षाची घरपट्टी आपण भरू असे प्रलोभन दाखिवले आहे. ५ आॅक्टोबर ते १३ अ‍ॅक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये हा जाहीरनामा मतदारांमध्ये वितरीत करण्यात आला.

३पाच वर्षे घरपट्टी भरण्याचे दाखिवण्यात आलेले आमिष हे निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, सोमवारी आडी ग्रमपंचायतीचे ग्रमसेवक अजित वसंत पोलेकर यांनी या प्रकरणी सरपंचपदाचा उमेदवार मधुकर महाडीक, जाहीरनाम्याचा प्रकाशक राजेंद्र वसंत खेडेकर, मुद्रक पार्वती प्रिंटींग प्रेस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक एस.डी. साळवी हे करीत आहेत.

 

 

Web Title:  Gram panchayat elections: Dasgaon, Veer, Bahur, Election peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.