व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर 

By निखिल म्हात्रे | Published: February 13, 2024 02:05 PM2024-02-13T14:05:30+5:302024-02-13T14:06:10+5:30

ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती.

Emphasis on online shopping on Valentine's Day | व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर 

व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन खरेदीवर भर 

अलिबाग - ‘व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन संकेतस्थळावर खरेदीसाठी 40 ते 80 टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात येत आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. 14 फेब्रुवारीला ग्राहकांनी अधिक खरेदी करावी यासाठी विविध खरेदी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती.

गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये समाजमाध्यमांच्या वाढलेला प्रभावामुळे ‘व्हॅलेनटाइन डे’च्या शुभेच्छा समाजमाध्यमांवर संदेश पाठवून देण्यात येत असल्या तरी बाजारपेठेत खास भेटवस्तू आणि गुलाब खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी कायम आहे. गुलाब खरेदी करतानाही ‘टॉप सिक्रेट’ आणि डच जातीच्या गुलाबांची मागणी वाढली असल्याचे फूलविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या प्रेमदिवसाच्या निमित्ताने तरुणांपासून वृद्धांपर्यंत भेटवस्तूंच्या दुकानात कोणीच फिरताना दिसत नव्हते.

एरव्ही बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असतानाच संकेतस्थळावर विविध सवलती असल्याने ग्राहकांनी आँनलाईन खरेदी करणे पसंत केले. संकेतस्थळावर कपडे, भेटवस्तूंबरोबर फुलांची खरेदीही करण्यात येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांवर तीस ते चाळीस टक्के सवलत देण्यात येत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कागदात गुंडाळलेले आणि विशिष्ट पद्धतीने सजवलेले गुच्छ ऑनलाइन उपलब्ध आहेत. अगदी 240 रुपयांपासून या गुच्छांची किंमत आहे.

बाजारपेठेत टॉप सिक्रेट, डच गुलाब -

व्हॅलेंटाईन्स डे’जवळ आल्याने बाजारपेठेतील गुलाब फुलांची आवाक मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र गुलाबांच्या फुलांचे दर हे दरवर्षीसारखेच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. लाल रंग असणाऱ्या चायना जातीच्या २० गुलाबांचा गुच्छाची किंमत ८० रुपये आहे तर गुलाबी रंगांच्या चायना जातीच्या २० गुलाबांच्या गुच्छाची किंमत ५० रुपये आहे. भारतीय जातीच्या ६ गुलाबांचा गुच्छाची किंमत ३० रुपये आहे. एकंदरीतच १० ते १५ रुपयांपासून गुलाबांच्या गुणवत्तेनुसार गुलाबांची किंमत असते. टॉप सिक्रेट आणि डच यासारख्या जातीच्या गुलाबांची मागणी सध्या बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे, असे फुलविक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Emphasis on online shopping on Valentine's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.