प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टीपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा, पनवेल महापालिकेचा उपक्रम

By वैभव गायकर | Published: April 24, 2024 05:29 PM2024-04-24T17:29:02+5:302024-04-24T17:29:59+5:30

धूळ-शमन वाहन ताफ्यात सज्ज, गाड्या कशा पध्दतीने काम करतात याचा आयुक्तांनी घेतला आढावा

Deployment of Multipurpose Dust Suppression Vehicle for Pollution Control, an initiative of Panvel Municipal Corporation | प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टीपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा, पनवेल महापालिकेचा उपक्रम

प्रदुषण नियंत्रणासाठी मल्टीपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकलचा उतारा, पनवेल महापालिकेचा उपक्रम

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पर्यावरणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्यदायी राहणीमान देण्यासाठी तसेच पनवेल महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रात धूळीवरती नियंत्रण आणण्याच्या द्ष्टीने पर्यावरण विभागाच्यावतीने खरेदी केलेल्या मल्टिपर्पज डस्ट सप्रेसशन व्हेइकल्स (धूळ शमन वाहन) महापालिकेच्या वाहन ताफ्यात सज्ज झाल्या आहेत.

या गाड्या कशा पध्दतीने काम करतात याचा आढावा आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी नुकताच घेतला.यावेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आदींसह स्वच्छता निरीक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पर्यावरणाचे भान जपण्यासाठी पनवेल महानगरपालिका माझी वसुंधरा संकल्पनेअंतर्गत विविध कार्यक्रम राबवत असते. या कार्यक्रमाच्या जोडीला महापालिकेने नुकतीच दोन अत्याधुनिक बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन व्हेइकल्स् खरेदी केली आहेत.

अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेले ही वाहने हवेतील धूलिकणांचा सामना करण्यासाठी  उपयुक्त आहेत. यामध्ये फवारणी आणि साफसफाईच्या उद्देशाने 6000 लीटरची पाण्याची टाकी, एअर कर्टन-आधारित वॉटर मिस्ट सप्रेशन सिस्टीम, फ्रंट आणि रिअर रोड फ्लशिंग सिस्टीम, ग्रीन बेल्ट गार्डनिंग क्लिनिंग सिस्टीम, आणि उंच झाडांवरील धूळ साफ करण्याच्या दृष्टीने  वैशिष्ट्य पूर्ण यंत्रणा यामध्ये समाविष्ट आहे. ही वाहने दररोज अंदाजे 80 किलोमीटर अंतर कापतात, ज्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विस्तृत परिसर स्वच्छ करणे सोपे होणार आहे. ही बहुउद्देशीय वाहने केवळ धूळ कमी करत नाही तर रस्ता आणि  दुभाजकांमधील हरित पट्टा स्वच्छ करण्यासही मदत करतात. मलनिःसारण केंद्राच्या पाण्याचा पुनःवापर-धूळ दाबणे आणि साफसफाई करण्यासाठी या वाहनामध्ये वापरण्यात येणारे पाणी हे मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी वापरणार.

Web Title: Deployment of Multipurpose Dust Suppression Vehicle for Pollution Control, an initiative of Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल