आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा, महामार्गावरील अपघातानंतर शवविच्छेदनास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 02:46 AM2017-10-27T02:46:15+5:302017-10-27T02:46:27+5:30

नागोठणे : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे, तर काहींना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.

Delay in postmortem after medical accident at the Health Center | आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा, महामार्गावरील अपघातानंतर शवविच्छेदनास विलंब

आरोग्य केंद्रात डॉक्टरांची वानवा, महामार्गावरील अपघातानंतर शवविच्छेदनास विलंब

Next

राजू भिसे 
नागोठणे : शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारापासून वंचित राहावे लागत आहे, तर काहींना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे.
रुग्णालयात असलेले अन्य डॉक्टरही रजेवर असल्याने आरोग्य सेवेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे यांच्याकडे विचारणा केली असता, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
नागोठणे शहर मुंबई-गोवा महामार्गस्थित असून प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्गावरच वसले आहे. महामार्गावर नेहमी अपघात होत असल्याने डॉक्टरांना तसेच कर्मचा-यांना येथे नेहमी सतर्क राहावे लागत असते. परिसरात अनेक गावे तसेच वाड्या असल्याने येथील नागरिक उपचारासाठी याच केंद्रात येत असल्याने आरोग्य केंद्र सायंकाळपर्यंत गजबलेले असते. साधारणत: एक वर्षापूर्वी सात वर्षे उत्तम सेवा देणारे एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. जी. वडजे सरकारी सेवेचा राजीनामा देऊन गेल्यानंतर कायमस्वरूपी अधिकारी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे सध्या आरोग्य केंद्राला उतरती कळा लागली आहे. केंद्रात इतर सेवा सुरळीत चालू असल्या तरी, ओपीडी सेवा महत्त्वाची असल्याने येथे डॉक्टर नसल्यास रु ग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो व त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. सध्या या केंद्रात बीएएमएस दर्जाचे डॉ. नितीन नेटके कार्यरत आहेत. मात्र, ते सुटीवर असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रोहे शहरात तीन तर संपूर्ण तालुक्यात एकूण ५२ प्रा. आरोग्य केंदे्र आहेत. जिल्ह्यात एकूण १३५ डॉक्टरांची नेमणूक असणे गरजेचे असले, तरी जिल्ह्यात सध्या केवळ ६२ एमबीबीएस तसेच बीएएमएस डॉक्टरच कार्यरत आहेत.
अपघात किंवा अनैसर्गिक कारणाने काही मृत्यू घडल्यास सरकारी नियमानुसार शवविच्छेदन करावे लागते. शवविच्छेदन करण्याचा अधिकार फक्त एमबीबीएस दर्जाच्या डॉक्टरलाच असतो.
सध्या केंद्रात त्या दर्जाचा वैद्यकीय अधिकारीच नसल्याने पाली किंवा रोहे येथून येथे डॉक्टरांना पाचारण करण्यात येते व यासाठी आठ ते दहा तास मृतदेह तसाच ठेवावा लागतो.
>नागरिकांची वैद्यकीय अधिकाºयाची मागणी
मंगळवारी रात्री येथे रेल्वेने धडक दिल्याने एका आदिवासी व्यक्तीचा मृतदेह येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. या कामासाठी बाहेरून डॉक्टर आणावा लागला असल्याने बुधवारी दुपारपर्यंत मृताच्या नातेवाइकांना तिष्ठत बसावे लागले, तर त्याच दिवशी सायंकाळी एका लहान मुलाला दुचाकीने धडक दिल्याने त्याचा अंत झाला होता.
या कामासाठी पुन्हा डॉक्टरांची गरज भासल्याने नागोठणे पोलिसांनी पुढाकार घेत स्वत: पाली येथून डॉक्टर आणल्याने या मुलाचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात पोलिसांना यश आले होते.
महामार्गावर असणाºया आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे असल्याने लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
> लाखो रुपयांचा खर्च वाया
>उपकेंद्रात कर्मचाºयांची ११ पैकी ३ पदे रिक्त
>दररोज बाह्यरु ग्ण विभागामध्ये
१५ ते २0 रु ग्ण उपचार घेत आहेत

Web Title: Delay in postmortem after medical accident at the Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर