पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 02:51 AM2017-10-26T02:51:23+5:302017-10-26T02:51:26+5:30

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dangerous, iron bars to reach the posh river bridge, the possibility of an accident | पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

पोशीर नदीपूल वाहतुकीस धोकादायक, लोखंडी सळ्या बाहेर आल्याने अपघाताची शक्यता

googlenewsNext

कांता हाबळे

नेरळ : कर्जत-मुरबाड राज्य मार्गावरील पोशीर नदीवरील पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्याने अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तक्रार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न चालक व प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
कर्जत-मुरबाड हा महत्त्वाचा राज्य मार्ग असून, दुचाकी, चारचाकी वाहनांबरोबरच दिवसरात्र अवजड वजनाची वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरील कळंब गावाजवळ पोशीर नदीवरील पुलावर लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलावरील निघालेल्या सळ्या टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन भरधाव वेगात असल्यास ते नदीतही पडू शकते. अशी दुर्घटना घटना घडू नये यासाठी बांधकाम विभागाने वेळीस यावर उपाययोजना कराव्यात. पुलाचे संरक्षण कठडेही कमकुवत झाले असून त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक महिन्यांपासून पुलावरील रस्त्यावर असलेल्या सळ्या उखडल्या आहेत. शिवाय खड्ड्यांमुळे वाहन उसळत असल्याने आरोग्याच्या व्याधीही उद्भवत असल्याचे प्रवासी सांगतात. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रवासी वाहनचालकांकडून केली जात आहे. यासंदर्भात कर्जत बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता अनिल करपे यांच्याशी या कर्जत-मुरबाड रस्त्यावरील नादुरुस्त रस्त्यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कर्जत-मुरबाड राज्यमार्गावरील पोशीर नदीवरील पुलावर अनेक महिन्यांपासून लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. असे असताना बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथे अपघात घडण्याआधी मार्गाची दुरु स्ती करावी. अन्यथा येथे अपघात घडल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरले जाईल. - धनेश राणे, सामाजिक कार्यकर्ते.
पोशीर नदीवरील मार्गावर वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे कसरत झाली आहे. लोखंडी सळ्या टायरला लागून किंवा रस्त्यावर निघालेल्या सळ्या चुकवताना जोरदार अपघात होऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याची दुरु स्ती होणे अवश्यक आहे.
- मच्छींद्र मसणे, वाहनचालक.

Web Title: Dangerous, iron bars to reach the posh river bridge, the possibility of an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.