निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:20 AM2018-08-31T04:20:27+5:302018-08-31T04:21:22+5:30

प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनचा वापर : जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांची माहिती

Continuing preparations for the election | निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

निवडणुकीची जय्यत तयारी सुरू

Next

अलिबाग : लोकसभेच्या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणेने जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत हाती घेतला आहे. २०१९ साली होणाऱ्या रायगड लोकसभेच्या निवडणुकीत प्रथमच व्हीव्हीपॅट मशिनच्या वापर करण्यात येणार आहे. तीन हजार ३२६ व्हीव्हीपॅट मशिन लवकरच प्राप्त होणार आहेत. रायगड लोकसभा मतदार संघामध्ये दोन हजार ६९३ मतदान केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायगड जिल्ह्यात तब्बल १२ हजार ५०० नवीन मतदारांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे २१ लाख ६६ हजार ८७२ एवढी मतदारांची संख्या राहणार आहे, परंतु ३१ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, असेही माने यांनी स्पष्ट केले.  मतदारांच्या जागृतीसाठी जिल्हास्तरावरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने महिला मतदारांचे प्रमाण वाढवणे, दिव्यांग मतदारांना विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी स्वीप कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. युवा मतदारांवरही निवडणूक विभागाने विशेष लक्ष केंद्रित करताना हायस्कूल आणि महाविद्यालयीन स्तरावर निवडणूक साक्षरता क्लब, चुनाव पाठशाळा स्थापन करण्यात येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मयत, स्थलांतरित, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. १०० मतदान केंद्रांची पडताळणी करण्यात आली आहे. मतदान केंद्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार ६९३ मतदान केंद्रे अस्तित्वात आली आहेत.

आॅनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी
च्रंगीत छायाचित्र स्वीकारून त्यांचे अद्यावतीकरणाचे काम सुरू आहे. नवीन मतदार नोंदणी झालेल्या ९४ हजार २१ मतदारांना निवडणूक ओळखपत्र देण्यात आले आहे. आॅनलाइन पध्दतीने मतदार नोंदणी करण्याची सोय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात २१ लाख ५४ हजार ३७२ मतदार
च्रायगड लोकसभा क्षेत्रामध्ये प्रथमच मतदानाकरिता व्हीव्हीपॅट मशिनचा वापर करण्यात येणार आहे. एम-३ बनावटीच्या तीन हजार ३२६ ईव्हीएम मशिन उपलब्ध झाल्या आहेत. तेवढ्याच व्हीव्हीपॅट मशिन २० सप्टेंबरपर्यंत मिळणार आहेत. १० जानेवारी २०१८ रोजी अंतिमरीत्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार रायगड जिल्ह्यामध्ये एकूण २१ लाख ५४ हजार ३७२ मतदार आहेत. सदर मतदारांपैकी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट छायाचित्र असलेल्या मतदारांची संख्या दोन लाख ३७ हजार ११९ आहे, तर मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या एक लाख २३ हजार ५२२ आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये तब्बल १२ हजार ५०० मतदारांची वाढ होण्याची शक्यता असली तरी, ३१ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे माने यांनी सांगितले.

Web Title: Continuing preparations for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.