जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 07:24 PM2024-03-09T19:24:09+5:302024-03-09T19:25:33+5:30

बंदराच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाचे स्वागत केले.

At JNPA's newly constructed additional liquid berth terminal, chemical-laden M. T. Arrival of India ship | जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन

जेएनपीएच्या नव्याने उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकलने भरलेल्या एम. टी. भारत जहाजाचे आगमन

मधुकर ठाकूर 

उरण: जेएनपीएने नव्याने तयार केलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलवर केमिकल घेऊन आलेले एम. टी. भारत जहाजाचे सुरक्षित आगमनाची ही तर आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करण्यासाठी बंदराची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करते. सागरी उत्कृष्टतेमध्ये नवीन मापदंड विकसित करणे आणि प्रस्थापित करणे सुरू ठेवल्याने हा क्षण संस्थेच्या कार्यक्षमता, सुरक्षितता आणि नाविन्यपूर्ण समर्पणाचा पुरावा असल्याच्या भावना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी व्यक्त केल्या आहेत.

जेएनपीएने ३१४ कोटी खर्चून ११.७ दशलक्ष टन क्षमतेच्या उभारलेल्या अतिरिक्त लिक्विड बर्थ टर्मिनलच्या उद्घाटनानंतर पहिल्याच खाद्यतेलाची वाहतूक करणारा एम.टी.भारत हा केमिकल टँकर या बंदरात दाखल झाला आहे. बंदराच्या गौरवशाली इतिहासातील महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेएनपीएच्या अधिकाऱ्यांनी या जहाजाचे स्वागत केले. यावेळी आनंद व्यक्त करताना जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ बोलत होते.

जेएनपीएच्या सागरी उत्कृष्टतेच्या सीमांना पुढे घेऊन जात आणि देशाच्या आर्थिक विकासात योगदान देणारे असे आणखी महत्वाचे क्षण साजरे करण्यासाठी जेएनपीए बंदर कायम प्रयत्नशील राहिल असे सांगतानाच एम.टी. भारतचे यशस्वी आगमन हा महत्त्वाचा प्रसंग आहे. यामध्ये सर्व भागधारक व सहयोगींही सहभागी झाले आहेत.तेही हा महत्त्वाचा प्रसंग साजरा करीत असल्याचे जेएनपीएचे प्रभारी अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी सांगितले. या स्वागत समारंभाप्रसंगी जेएनपीएचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि बीपीसीएलचे प्रतिष्ठित प्रतिनिधी आणि जहाज मास्टर, इगोर इग्नाटिएव्ह आदी उपस्थित होते.

Web Title: At JNPA's newly constructed additional liquid berth terminal, chemical-laden M. T. Arrival of India ship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.