अश्वशर्यतीत नेरळचा ‘राजा’ ठरला सरस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:19 AM2019-02-08T03:19:00+5:302019-02-08T03:19:14+5:30

नेरळजवळील नेवाळी येथील माळरानावर आयोजित केलेल्या अश्वशर्यतींमध्ये दोन राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ३०० हून अधिक घोड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नेरळचा ‘राजा’ हा घोडा सरस ठरला.

 Ashar was the 'king' of Navy | अश्वशर्यतीत नेरळचा ‘राजा’ ठरला सरस

अश्वशर्यतीत नेरळचा ‘राजा’ ठरला सरस

googlenewsNext

नेरळ : नेरळजवळील नेवाळी येथील माळरानावर आयोजित केलेल्या अश्वशर्यतींमध्ये दोन राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ३०० हून अधिक घोड्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत नेरळचा ‘राजा’ हा घोडा सरस ठरला.
नेवाळी येथील माळरानावर नेरळच्या सिद्धिविनायक मित्रमंडळाच्या वतीने आयोजित अश्वशर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांतील अश्व सहभागी झाले होते. ८०० मीटर लांबीची धावपट्टी आणि तीदेखील एकाच पातळीवरील असल्याने अश्वप्रेमींना नेवाळी येथील शर्यतीबद्दल कुतूहल असते. त्यात या स्पर्धेत नेरळ, माथेरान येथील स्थानिक घोडे तसेच नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सिन्नर भागातील नामांकित घोडे तसेच पुणे, मुंबई, ठाणे या भागांतील घोड्यांसह यावर्षी पंजाब राज्यातील पाच घोडे स्पर्धेत उतरले होते.
पंजाब येथून आलेले उंच घोडे हे सर्व पारितोषिके पटकावून जाणार अशी चर्चा होती. मात्र, माळरानावर घोडे पळविण्याची किमया करणाऱ्या स्थानिक घोडेवाल्यांनी त्यांची पुरती दमछाक केलेले अश्वप्रेमींनी पाहिले. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात नेरळच्या राकेश चव्हाण यांच्या राजा घोड्याने बाजी मारत ‘कर्जत केसरी’ आणि ‘स्पर्धा विजेता’ ही दोन्ही पारितोषिके प्राप्त केली. तर दुसºया क्र मांकावर बोरगाव येथील अमोल मोरे यांचा बच्चा घोडा, तिसºया मुंबई गोरेगाव येथील प्रीतेश मोरे यांचा घोडा राहिला.
 

Web Title:  Ashar was the 'king' of Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड