मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात : खालापूरजवळ 2 कारची धडक झाल्यानं तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:59 IST2017-12-20T10:18:55+5:302017-12-20T12:59:10+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांना धडकल्यानं दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात : खालापूरजवळ 2 कारची धडक झाल्यानं तिघांचा जागीच मृत्यू
रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. दोन कार एकमेकांना धडकल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 6 जण जखमी झाले आहेत. मुंबईला येणा-या मार्गावर खालापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. कारचा टायर फुटल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलमधील खासगी रुग्णालयात जखमींना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इनोव्हा (एमएच ०४ सीजे ०४२३) कारचं मागील टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व ती समोरुन येणा-या कारवर जाऊन आदळली. दरम्यान, या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.