मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, स्कूल व्हॅनची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:27 IST2017-11-25T02:27:22+5:302017-11-25T02:27:35+5:30

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Accident in Mumbai-Goa highway, school van bikerake | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, स्कूल व्हॅनची दुचाकीला धडक

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, स्कूल व्हॅनची दुचाकीला धडक

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास स्कूल व्हॅन आणि दुुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलवरील दोन जण जागीच ठार झाले, तर व्हॅनचालक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
विशाल शिंदे (रा. वावे, ता. महाड) व मंगेश बोराडे (रा. तळोशी ता. महाड) हे दोघे दुचाकीवरून महाडमध्ये येत असतात. केंबुर्ली गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास समोरून येणाºया वहूर येथे शाळेतील मुले आणण्यासाठी जाणाºया स्कूल व्हॅनची धडक बसली. अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, दुचाकीचा चक्काचूर झाला, तर दुचाकीस्वार विशाल शिंदे व मंगेश बोराडे हे जागीच ठार झाले. व्हॅनचालक इंद्रजीत ठोंबरे (रा. महाड) हा व्हॅनमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही काळ महामार्ग ठप्प झाला होता. घटनेची माहिती मिळताच महाड शहर तसेच महामार्ग वाहतूक शाखा महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल के ले. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांना रुग्णवाहिकेतून महाडमध्ये आणण्यात आले. या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Accident in Mumbai-Goa highway, school van bikerake