महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:22 AM2019-04-03T03:22:38+5:302019-04-03T03:22:55+5:30

दोन लाख ८२ हजार मतदार बजावणार हक्क : निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

8,450 new voters in Mahad Taluka | महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

महाड तालुक्यात ८,४५० नवमतदार

Next

सिकंदर अनवारे 

दासगाव : लोकसभा निवडणुकीसाठी रायगड मतदारसंघात एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तर दुसरीकडे प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. महाड मतदारसंघात यावेळी एकूण २ लाख ८२ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, तर जवळपास ८४५० नवमतदार आपला पहिलाच मतदानाचा हक्क बजावण्यास उत्सुक आहेत.

विधानसभेचा १९४ मतदारसंघ हा माणगाव, महाड आणि पोलादपूर असा आहे. माणगावमधील काही गावांचा समावेश यामध्ये आहे. या मतदारसंघात प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. महाड मतदारसंघात पूर्वी २ लाख ७१ हजार मतदार संख्या होती ती यावर्षी वाढून २ लाख ८२ हजार झाली आहे, म्हणजेच जवळपास ११ हजार मतदार वाढ झाली आहे. यामध्ये १८ वर्षे पूर्ण झालेले ८४५० तरुण मतदार हे पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाड तालुक्यात एक मतदारकेंद्र संवेदनशील आहे. मतदान करण्यासाठी लागणाऱ्या मतदान ओळखपत्रांचे वाटपदेखील जलद गतीने सुरू असून जवळपास ९७ टक्के ओळखपत्र वाटप झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४३ एस.टी.बसेस, १८ मिनी बसेस, आणि ७ जीपची गरज लागणार असल्याचे महाडचे प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले. ज्या तरुणांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, अशा नवमतदारांना ओळखपत्र वाटप झाले आहे. नव्याने पाठवण्यात आलेल्या मतदारांचे ओळखपत्र लवकरच प्राप्त होईल, असे निवासी नायब तहसीलदार नाईक यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी प्रशासनाकडून केली जात असून, मतदारापर्यंत जाऊन मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसून येत आहे. याकरिता मतदार जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी पथनाट्यातून मतदारांमध्ये तर विद्यार्थ्यांच्या संकल्प पत्रातून पालकांमध्ये जागृती केली जात आहे. ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानक, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी व्ही.व्ही.पॅट यंत्राची माहिती दिली जात आहे. याकरिता एक वाहन संपूर्ण तालुक्यात फिरत आहे. संकल्प पत्रातून पालकांकडून मतदान करण्याचा संकल्प लिहून घेणार आहेत. तालुक्यातील शाळांमधून हे संकल्प पत्र वितरीत केले जात आहे, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार एस. व्ही. नाईक यांनी दिली.

रॅली काढून विद्यार्थ्यांनी के ली मतदान जागृती
च्येथील कॉम्रेड मोरे प्रागतिक विद्यालय दासगाव यांच्यामार्फत दासगाव गावात मतदार जनजागृती अभियानांतर्गत रॅली काढून जागृती करण्यात आली.
च्या वेळी शाळेतील शिक्षक आणि मुलांनी दासगाव नाका, मोहल्ला, बंदर या भागात जाऊन मतदारराजा जागा हो अशा प्रकारच्या घोषणा देऊन मतदान करण्याबाबत माहिती दिली, शिवाय मुलांच्या हातात जनजागृतीपर फलक देण्यात आले होते.
च्संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे याकरिता ही रॅली काढण्यात आली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर अदलापुरे, जीवन हाटे, दीपक मोरे, अनंत कांबळे, पोपट लोंढे, रामचंद्र शिंदे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी अश्रफ म्हैसकर सहभागी झाले होते.
 

Web Title: 8,450 new voters in Mahad Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.