चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना; रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:36 AM2019-03-13T02:36:56+5:302019-03-13T02:37:07+5:30

२५० रुपयांचा दंड आकारला

Wrong train, landfill citizens; The train collapsed late | चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना; रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका

चूक रेल्वेची, भुर्दंड नागरिकांना; रेल्वेगाडी उशिरा आल्याचा फटका

Next

पुणे : फलाट तिकीट घेऊन रेल्वे स्थानकात प्रवेश केलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना गाड्या विलंबाने आल्याचा चांगलाच फटका बसत आहे. फलाट तिकिटाची वेळ संपल्याचे कारण देत त्यांच्याकडून २५० रुपयांचा दंड आकारला जात आहे. गाडीला विलंब होणे ही प्रवाशांची चूक नाही. तरीही दोन तासांंची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेण्याचा नियम आहे. या नियमाचा भुर्दंड सध्या अनेकांना सोसावा लागत आहे.

रेल्वेस्थानकांवरील फलाटावर नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी अनेक जण येत असतात. त्यासाठी प्रवाशांव्यतिरिक्त इतरांना १० रुपयांचे फलाट तिकीट घ्यावे लागते. या तिकीटाची मुदत दोन तासांची असते. ही मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घ्यावे, असा नियम आहे. दररोज हजारो फलाट तिकिटांची विक्री होते. त्यातून रेल्वेला मोठा महसूल मिळतो. पण, फलाट तिकीट काढणाऱ्या अनेकांना वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी एका तरुणालाही याचा फटका बसला.

रेल्वेच्या नियमानुसार तिकिटाची दोन तासांची मुदत संपल्यानंतर नवीन तिकीट घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास त्यावेळी संबंधित फलाटावर उभ्या असलेल्या गाडीचे कमीत कमी तिकीट व २५० रुपये दंड अशा एकूण रकमेची दंडात्मक कारवाई केली जाते. संबंधित तिकीटधारक नेमक्या कोणत्या गाडीसाठी आला आहे, हे ओळखणे शक्य नाही. त्यामुळे एखादी गाडी विलंबाने आली तरी संबंधितांना नवीन तिकीट घेणे गरजेचे आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी
पुणे विभाग, मध्य रेल्वे

Web Title: Wrong train, landfill citizens; The train collapsed late

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे