सोलापूर रस्त्याच्या कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 02:25 AM2018-11-13T02:25:11+5:302018-11-13T02:25:30+5:30

उड्डाणपूल, सायकल ट्रॅक, बीआरटी मार्ग : रुंदीकरण होऊनही, हडपसरमध्ये रोज होते तासन्तास कोंडी; अयोग्य फलकाने वाहनचालक रस्ता चुकतात

When will the eclipse of Solapur road be eclipsed? | सोलापूर रस्त्याच्या कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?

सोलापूर रस्त्याच्या कोंडीचे ग्रहण सुटणार कधी?

Next

हडपसर : सोलापूर रस्ता आणि वाहतूककोंडी हे एक समीकरणच बनले आहे. स्वारगेट ते हडपसरदरम्यान सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या तरीसुद्धा वाहतूककोंडीचा आजार काही सापडला नाही, वाहतूककोंडी सुटावी, यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल, त्यानंतर सायकलट्रॅक आणि पदपथ बनविले, त्यामुळे रस्ता रुंद होण्याऐवजी अरुंद झाला आणि वाहतूककोंडी सुटण्याऐवजी जटिल बनली आहे, असा त्रागा वाहनचालक आणि नागरिकांनी केला आहे.

हडपसर गाडीतळ येथील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलावर उड्डाणपूल, मगरपट्टा चौकात उड्डाणपूल उभारले आहेत. मात्र, या दोन्ही पुलांच्या सुरुवातीला दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवशिक्या आणि शहरात नव्याने येणाऱ्या वाहनचालकांचा गोंधळ होत आहे. वैभव चित्रमंदिरासमोरील मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला नामफलक आणि रिफ्लेक्टर नसल्यामुळे दररोज वाहनचालक फसतात. पुलाच्या कठड्याची उंची कमी असून, तीसुद्धा तुटलेली आहे, त्यामुळे दररोज रात्रीच्या वेळी वाहने त्यावरून जात असल्याने अपघात होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशसानाने त्याची दुरुस्ती केली नसल्याचे नागरिकांनी सांगितले
सोलापूर रस्त्यावर अवघा दोन किमी बीआरटी मार्ग शिल्लक आहे, त्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली आहे. बीआरटी मार्गातून येणाºया वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जाते. मात्र, तुटपुंज्या बीआरटी मार्गामुळे वाहतूककोंडी सुरळीत होण्याऐवजी विस्कळीत आणि वाहनचालकांना मन:स्ताप होण्यास जास्त मदत होत आहे, अशी तक्रार अनेक वाहनचालकांनी केली आहे. मगरपट्टा चौकातून पुण्याकडे जाण्यासाठी बीआरटी मार्ग शिल्लक नाही. मात्र, मार्ग फलक आजही झळकत आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे बुचकळ्यात पडत आहेत.

बीआरटी असून अडचण नसून खोळंबा
सोलापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तुटपुंज्या बीआरटी मार्ग काढून टाकला पाहिजे. हडपसर ते स्वारगेटदरम्यान सकाळी आणि सायंकाळी वाहनांची गर्दी असते. त्यात मगरपट्टा चौक ते फातिमानगर चौकादरम्यान शिल्लक असलेला तुटपुंज्या बीआरटी मार्ग वाहनचालकांना अडथळा ठरत आहे. बसथांबे रस्त्यात असल्याने गर्दीतून बसथांब्यावर कसे जायचे, अशा प्रश्न पीएमपी प्रवाशांना पडला आहे.
अस्वच्छ पीएमपीचे थांबे
४पीएमपी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून
पीएमपी प्रवाशांसाठी बसथांबे उभारले आहेत. मात्र, रामटेकडी पूल, वैदूवाडी चौक या ठिकाणच्या बसथांब्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
रंगरंगोटी नाही, स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हे बसथांबे प्रवाशांसाठी बांधले आहेत की बसथांबे बांधल्याचे दाखवण्यासाठी उभारले आहेत, असा प्रश्न पडला आहे.

झाडे जळाली कशी...?
रस्त्याची शोभा वाढावी आणि प्रवास करताना आल्हाददायक वातावरण असावे, या संकल्पनेतून महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च वृक्षारोपण केले. मात्र, त्याची निगा राखण्याचे काम करण्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक झाडांची वाढ झाली नाही, तर अनेक झाडे जळालेली दिसत आहेत. मात्र देखभाल-दुरुस्तीसाठी खर्च दाखविला आहे, तो कुठे जातो, याचा जाब नागरिकांनी विचारला आहे.
बीआरटीचे धोकादायक बसथांबे
गेल्या आठवड्यात बीआरटी मार्गात बस आणि मोटारीचा समोरासमोर अपघात झाला, त्यामध्ये सहा जण जखमी झाले. आतापर्यंतच्या अपघातामध्ये सर्वात जास्त अपघात बीआरटी मार्गात झाले आहेत. बीआरटी मार्गामुळे बसथांबे रस्त्याच्या मध्येच आणून ठेवले आहेत. त्यामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बसथांब्यावर जीव मुठीत धरून जावे लागत आहे. अपघाताचा धोका असूनही प्रशासन अद्याप त्याकडे डोळेझाक का करीत आहे?

 

Web Title: When will the eclipse of Solapur road be eclipsed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.