सायकलीवरून शहरातील गणरायांचे दर्शन; आयटीतील तरुणाचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 01:53 AM2018-09-16T01:53:32+5:302018-09-16T01:53:51+5:30

आयटीतील तरुणाची गणरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी

Visitors of the city's bicycles; IT youth activity | सायकलीवरून शहरातील गणरायांचे दर्शन; आयटीतील तरुणाचा उपक्रम

सायकलीवरून शहरातील गणरायांचे दर्शन; आयटीतील तरुणाचा उपक्रम

Next

पुणे : तुम्हाला शहराच्या मध्यवर्तीमधील गणरायांचे दर्शन करायचे असेल, तर कोंडीमुळे दुचाकी, चारचाकी आणणे अवघड आहे; पण तरीही तुम्ही अतिशय कमी वेळेत आणि कुठेही कोंडीत न अडकता सायकलवरून दर्शन करू शकता. त्यामुळे एक तर प्रदूषण कमी होईल, तुमच्या इंधनाचे पैसे वाचतील आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. अशा अनके फायद्यांचा प्रसार व्हावा, यासाठी एका आयटीतील तरुणाने गणरायाच्या दर्शनासाठी सायकलवारी केली. मधुकर माझिरे असे त्या सायकलस्वाराचे नाव आहे.
सध्या वाहनांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे शहरात दुचाकी, चारचाकी आणणे खूपच त्रासदायक ठरत आहे. त्यात आता गणेशोत्सव असल्याने कोंडीत अधिकच भर पडते. परंतु, ही कोंडी कमी करायची असेल, तर आता सायकलस्वारी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी महापालिकेने ठिकठिकाणी शेअरिंग सायकलही उपलब्ध करून दिल्या आहेत. हे सर्व विचार माझिरे यांच्या डोक्यात आले आणि त्यांनी सायकलवरून गणेश दर्शनाचा प्रयोग आज केला.
याबाबत माझिरे म्हणाले, ‘‘मी आयटीमध्ये काम करतो. तेव्हा दुचाकीवरून कार्यालयात जातो. प्रचंड वाहतूककोंडीमुळे मी खूप वैतागतो. घरी आलो की, सर्व एनर्जी संपलेली असते. त्यामुळे दुचाकीवर गणपती दर्शन करणे म्हणजे पुन्हा डोकेदुखीच. म्हणून मी सायकलवर दर्शन करण्याचे ठरविले. मला सायकलची खूप आवड असल्याने मी हा उपक्रम केला. तसेच, कोथरूड वाहतूक सल्लागार समितीचा सदस्य असल्याने सायकल वापरून प्रदूषणही कमी केले. शहरातील अनेकांनी असा प्रयोग केला, तर कोंडी कमी होऊ शकतो. महापालिकेने सायकलही उपलब्ध करून दिल्या आहेत.’’

तीन तासांत गणरायांचे दर्शन
आज सकाळी ११ वाजता त्यांनी कोथरूड येथून सुरुवात केली आणि नदी पात्राच्या रस्त्यातून मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर तेथून आजूबाजूचे गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, गुरुजीतालीम, बाबू गेनू, तांबडी जोगेश्वरी या गणरायांचे दर्शन घेऊन, त्यांनी नारायण पेठ ते नवी पेठ अशी दर्शनवारी केली.

या संपूर्ण दर्शनाला त्यांना तीन तास वेळ लागला. सकाळी ११ वाजता सुरू केलेली ही दर्शनवारी दुपारी २ वाजता संपली. यामध्ये त्यांनी
मध्यवर्ती भागातील मानाचे गणपती व इतर २५ गणपतींचे दर्शन घेतले.

अनेक मंडळांकडून उपक्रमाचे स्वागत
या उपक्रमाला त्यांना ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच मंडळांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सायकल प्रत्येक मंडळाच्या मंडपापर्यंत घेऊन जाता आली. तसेच, कुठेही गर्दीचा त्रास झाला नाही किंवा गर्दीत सायकल अडकली नाही. हा उपक्रम केल्यानंतर, माझिरे यांना अनेक त्यांच्या मित्रांनी, परिचित असणाºयांनी आम्ही ही यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक
असल्याचे सांगितले. अनेकांनी सायकल क्लब बनविण्याचे विचारही व्यक्त केले.

सायकलवरून दर्शनाचे फायदे
वाहतूककोंडीतून सुटका
प्रदूषण कमी होते
इंधनाची बचत
आरोग्यासाठी उपयुक्त

Web Title: Visitors of the city's bicycles; IT youth activity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.