महाराष्ट्रात विजय युतीचाच ; निश्चित आकडा सांगण्यास मात्र आदित्य ठाकरेंचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 12:55 PM2019-04-09T12:55:25+5:302019-04-09T12:56:02+5:30

सध्या सर्वत्र एकच हवा, एकच रंग आणि एकच भगवा भगवा दिसत असून विजय युतीचाच होणार आहे.

victory of Alliance in Maharashtra fixed ; Aditya Thackeray | महाराष्ट्रात विजय युतीचाच ; निश्चित आकडा सांगण्यास मात्र आदित्य ठाकरेंचा नकार

महाराष्ट्रात विजय युतीचाच ; निश्चित आकडा सांगण्यास मात्र आदित्य ठाकरेंचा नकार

Next

पुणे : महाराष्ट्रात सध्या युतीचीच हवा असून आमचाच विजय होणार आहे असा विश्वास युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केला.मात्र निश्चित आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला. 
शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी युतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. यावेळी नरपतगिरी चौकामध्ये महायुतीकडून सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, आमदार बाबुराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे, जि. प. गटनेत्या आशा बुचके, सुलभा उबाळे, अनिल देसाईउपस्थित  होते. सभेनंतर अर्ज भरताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की,आमचा संपूर्ण महाराष्ट्रात फॉर्म भरायला जायचा प्रयत्न आहे.शिवाय प्रचार तर सुरू आहेच.सध्या सर्वत्र एकच हवा, एकच रंग आणि एकच भगवा भगवा दिसत असून विजय युतीचाच होणार आहे.शिरूरमधील बैलगाडी शर्यतीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, बैलगाडीचा मुद्दा आहेच पण पहिला मुद्दा धनुष्यबाण आणि कमळाचा आहे. आणि मग त्यानंतर इतर वचन पूर्ण करु असे आश्वासन द्यायलाही ते विसरले नाहीत.मात्र प्रत्यक्ष सभेत ठाकरे यांनी हजेरी न लावल्याने कार्यकर्त्यांची मात्र निराशा बघायला मिळाली.
 

Web Title: victory of Alliance in Maharashtra fixed ; Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.