आवक वाढल्याने भाज्यांचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:16 AM2018-02-09T01:16:31+5:302018-02-09T01:16:33+5:30

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला.

Vegetable prices collapsed due to inward rise | आवक वाढल्याने भाज्यांचे भाव गडगडले

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव गडगडले

googlenewsNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाशिवरात्रीला सहा दिवस अवकाश असल्याने आज बाजारात आंध्र प्रदेशातून सोळा टनाचा रताळी घेऊन आलेला ट्रक मागणीअभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाºयाला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील बाजारात बटाटा ७०० रुपये, तर कांद्याला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी विभागात वातावरणातील बदलामुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मेथीची बाजारात मोठी आवक झाली.
>काºहाटी : पालेभाज्यांना भाव मिळत नसल्याने शेतात पिकविलेला माल कोठे विकायचा, याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मिळेल त्या भावाने शेतमाल विकावा लागत आहे.
चार-पाच वर्षांच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या भागात यंदा समाधानकारक पाऊस पडला. पाण्याच्या जोरावर शेतकºयाने शेतात जनावरांच्या चाºयाबरोबर पालेभाज्या कांदा, दोडका, मेथी, कोथिंबीर, घेवडा, हिरवी मिरची आदी पिके घेऊन कुटुंबाला आर्थिक मदतीतून बाहेर येण्यासाठी ४ पैसे कसे मिळतील, या आशेने शेतीमाल बाजारपेठेत पाठविल्यानंतर शेतकºयांच्या पदरी खर्चदेखील निघत नसल्याची चित्र आहेत.
बहुतांश भागात शेतकरी शेतात पिकवलेला शेतीमाल बारामती, पुणे, हडपसर या भागात विक्रीसाठी घेऊन जातात. सध्या मेथीची पेंढी ३-४ रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे मिळणाºया पैशामध्ये गाडीचे भाडे, बियाण्यांचा खर्च, औषधफवारणी व मजुरांचा पगार यांचा ताळमेळ काढता शेतकºयाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. निवळ बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांपुढे शेतीमाल विकायचा कसा, पैसे कोठून आणायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या वेळी शेतकºयाकडे कांदा नव्हता, त्या वेळी कांद्याचे दर ७०-८० रुपयांपर्यंत गेले होते. आज शेतकºयाचा माल बाजारात येऊ लागला, तर त्याला १२-१५ रुपये दर मिळायला लागला. २० रुपयांची मेथीची पेंढी आज २-३ रुपयांना विकावी लागत आहे. या बाजारभावाच्या चढउतारांमुळे शेतकºयाचे आर्थिक गणितच विस्कटले असल्याची खंत कºहाटीचे शेतकरी बाळासाहेब वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
>भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव रुपयांत असे : कोबी - २ ते ३, फ्लॉवर - २ ते ३, टोमॅटो - ४ ते ५, बीट - २ ते ४, दुधी भोपळा - ४ ते ५, वालवर - ६ ते ७, ढोबळी - १० ते १२, काकडी - १० ते १५, गाजर - १२ ते १४, वाटाणा - १५ ते २०.
>तेजीत असलेल्या भाज्या रुपयांत अशा : भेंडी - २० ते २५, गवार - २५ ते ३०, शेवगा - ३० ते ३५, हिरवी मिरची - ३० ते ३५.
>पालेभाज्यांचे
जुडीचे भाव
रुपयांत असे :
शेपू -२, मेथी-३, पालक - २, कोथिंबीर - २.
>भाज्यांचे दर सद्य:स्थितीत सर्वसाधारण आहेत. लागवड ही मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात या भाज्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमीत कमी करून उत्पादन घ्यावे. जेणेकरून भाजीपाला पिके तोट्यात जाणार नाहीत.
- राजेंद्र वाघमोडे, कृषितज्ज्ञ

Web Title: Vegetable prices collapsed due to inward rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.