दोन अपघातांत दोन ठार; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:48 AM2017-08-19T01:48:17+5:302017-08-19T01:48:19+5:30

बेल्हा व आळेफाटा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार व एक जण जखमी झाले आहेत.

Two killed in two accidents; One injured | दोन अपघातांत दोन ठार; एक जखमी

दोन अपघातांत दोन ठार; एक जखमी

Next

आळेफाटा : बेल्हा व आळेफाटा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार व एक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांत अपघाताचे गुन्हे दाखल झाले आहेत.
गुरुवारी रात्री नऊ वाजता बेल्हा परिसरात अपघात झाला. आळेफाटा बाजूने बेल्हेकडे जाणारा टेम्पो (एमएच १७ एजी ४०९२) व आळेफाट्याकडे येणारी दुचाकी यांच्यात विचित्र अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील भगवान सोमनाथ उघडे (वय ३५, रा. खानापूर अकोले) गंभीर जखमी होऊन ठार झाले, तर दुचाकीवरील गोरख बबन मेंगाळ (वय २८, रा. निमगावपागा, संगमनेर) जखमी झाले.
दुसरा अपघात शुक्रवारी सकाळी आळेफाटा चौकापासून जवळच नगर रस्त्यावर झाला. रिक्षाला ट्रकने धडक दिल्याने पायी जाणारे रामकृष्ण यशवंत औटी (वय ६५, रा. राजुरी) क्रेनवर आदळल्याने यामध्ये औटी गंभीर जखमी होऊन ठार झाले.

Web Title: Two killed in two accidents; One injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.