महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 02:21 PM2018-05-03T14:21:08+5:302018-05-03T14:21:08+5:30

वाढदिवसानिमित्त फटाके वाजवत असताना फटाक्याची ठिणगी विवाह समारंभ असलेल्या विवाह मंडपावर पडली. त्यात मंडपाला आग लागून थोडे नुकसान झाले. 

two brothers complaint registred In the case of molestation | महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल

महिलेच्या विनयभंग प्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी दोघा भावांविरोधात महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : फटाक्याची ठिणगी पडून मंडप जळाल्याच्या कारणावरून झालेल्या वादंगाचा जाब विचारण्यास गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुळशी तालुक्यातील माण गावात ही घटना मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा भावांविरोधात महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप नामदेव भरणे व सुनील नामदेव भरणे अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत हिंजवडी पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या नातेवाईकांच्या घरी विवाह समारंभ असल्याने घराच्या दारात मंडप उभारण्यात आला होता. तर भरणे यांच्या घराजवळ वाढदिवसानिमित्त रात्री बाराला फटाके वाजविले. फटाके वाजवत असताना, फटाक्याची ठिणगी विवाह समारंभ असलेल्या ठिकाणी मंडपावर पडली. मंडपाला आग लागून थोडे नुकसान झाले. याप्रकरणी जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला व त्यांचे नातेवाईक गेले. त्यावेळी भरणे बंधूनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. गुन्ह्याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहे. 

Web Title: two brothers complaint registred In the case of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.