थरार! बिबट्याची झेप चुकली अन् तोंड डांबरी रस्त्यावर आपटलं , हल्ल्यातून युवक थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 08:33 AM2017-09-10T08:33:43+5:302017-09-10T08:34:26+5:30

जुन्नर तालुक्यातील आंबेविहीर परिसरात बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री गाडीवरून चाललेल्या युवकावर बिबट्याने झेप घेतली पण...

Thunder! The leopard misses off and faces a dirt road, saved young people briefly from attack | थरार! बिबट्याची झेप चुकली अन् तोंड डांबरी रस्त्यावर आपटलं , हल्ल्यातून युवक थोडक्यात बचावला

थरार! बिबट्याची झेप चुकली अन् तोंड डांबरी रस्त्यावर आपटलं , हल्ल्यातून युवक थोडक्यात बचावला

Next

पुणे, दि. 10 -  मंगरूळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात बिबट्याचे हल्ला सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री गाडीवरून चाललेले सीताराम लामखडे यांच्यावर बिबट्याने झेप घेतली. मात्र ती अयशस्वी झाली आणि लामखडे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. या भागात बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने पिंजरा लावला आहे.
आंबेविहीर परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरे व माणसांवर हल्ले सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी देखील किसन नलावडे यांची एक शेळी बिबट्याने भरदिवसा जागेवरच मारून टाकली तर आता बिबट्याने रात्रीच्या वेळी घरी दूध काढायला चाललेले सीताराम चंद्रकांत लामखडे यांच्या गाडीवरच बिबट्याने अचानक झेप घेतली. ते गाडी जोरात चालवीत असल्यामुळे बिबट्याची झेप मागच्या बाजुला गेली. त्यांच्या मागच्या डिक्कीला बिबट्याचा एक पंजा ओरखडला. त्यामुळे त्यांची गाडी डगमगली; त्यांनी मागे वळून पाहिले असता बिबट्या जाताना दिसले. झालेल्या प्रकारामुळे ते खूपच घाबरलेले होते. त्या बिबट्याचे तोंड डांबरी रस्त्यावर जोरदार आपटले. त्यानंतर बिबट्या वनखात्याच्या हद्दीत निघून गेला.
...अन् बिबट्याची झेप चुकली
अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना काहीही सुचतच नव्हते. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच येऊन परिसरातील इतर लोकांना माहिती दिली. गाडी जोरात असल्यामुळेच बिबट्याची झेप चुकली.केवळ दैव बलवतर म्हणूनच ते बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले आहेत.
या परिसरात सुभाष नढे यांच्या शेतात वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्याचे हल्ला सत्र
सुरू झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले
आहे.

Web Title: Thunder! The leopard misses off and faces a dirt road, saved young people briefly from attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.