खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:45 AM2018-11-17T01:45:41+5:302018-11-17T01:46:41+5:30

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब

Throwback of Kharudi Bandhali Leak | खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

खरपुडी बंधाऱ्याची गळती थांबेना

Next

दावडी : खरपुडी (ता. खेड) येथील बंधाºयाची गळती काही थांबण्याचे नाव घेत नाही. पाटबंधारे विभागाने गळती रोखण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी केली. मात्र, या बंधाऱ्यातून हजारो लिटर रोज पाण्याची नासाडी होत आहे. पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाणी वाया जात असल्याचे शेतकरी आरोप करीत आहेत.

भीमा नदीपात्रावर खरपुडी येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. हा बंधारा चासकमान धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे तुडुंब भरला आहे. या बंधाºयाच्या पाण्यावर खरपुडी खुर्द, खरपुडी बुद्रुक, मलघेवाडी, मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म) या परिसरातील शेतकरी शेकडो एकर हेक्टर क्षेत्रावर रब्बी व उन्हाळी हंगामातील पिके घेत असतो. महिन्यापूर्वी या बंधाºयाला लोखंडी ढापे बसवण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाने यंदा काळजीपूर्वक लोखंडी ढापे बसवण्यात आले नाहीत. अनेक ठिकाणी जीर्ण झालेले ढापे बसवण्यात आले. गेल्या वीस वर्षांपासून सतत पाण्यात राहिल्याने लोखंडी ढाप्यांना गंज चढला आहे. तसेच पत्रा सडला असून मोठी मोठी छिद्रे पडली असून त्या वाटून पाण्याचे फवारे उडत आहेत. तसेच काही ठिकाणी गाळ्यांचे दगड निखळले आहेत.
पाटबंधारे विभागाने मागील वर्षी सत्तर लोखंडी ढापे नवीन आणले होते. पण ते अपूर्ण ठरले. यंदा पाटबंधारे विभागाने नवीन आणि जुने ढापे बसविले. मात्र, जीर्ण झालेल्या ढाप्यांवाटे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे.

बंधाºयाचा निखळला होता ढापा

मागील आठवड्यात बंधाºयाचा एक ढापा पाण्याचा दाब वाढल्याने निखळला होता. त्या निखळलेल्या ढाप्याद्वारे दोन दिवस लाखो लिटर पाणी वाया गेले. पाटबंधारे विभागाने घाईघाईने या ढाप्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा दाब मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बंधाºयाच्या एका गाळ्याला पोत्यात झाडपाल्याची पाने घालून ही पोती निखळलेल्या ढाप्याला लावण्यात आली.
मात्र, गळती थांबली नाही, या बंधाºयाला टाकलेल्या सर्व गाळ्यातील ढाप्यांमधून पाण्याची गळती सुरू आहे. एका ठिकाणी प्लॅस्टिकचा कागद लावण्यात आला आहे. लोखंडी ढापे बसवण्यासाठी लावण्यात आलेले सिमेंट वाहून गेले आहे.

ही गळती अशीच सुरू राहिली तर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने चासकमान धरणाचेही पाणी मिळेल की नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही होणारी पाण्याची गळती रोखणे गरजेचे बनले असून पाण्याची नासाडी होऊ नये, म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली पाहिजे.

Web Title: Throwback of Kharudi Bandhali Leak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे