बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 08:04 PM2018-05-26T20:04:47+5:302018-05-26T20:04:47+5:30

बारामती येथून तीन बांगलादेशी नागरिक पळाले असल्याचे तसेच ते रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता बारामती पोलीस ठाण्याकडून दौंड पोलिसांना कळविण्यात आली होती

Three Bangladeshi person who escaped from Baramati arrested in daund | बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक

बारामती येथून पळालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना दौंडला अटक

Next

दौैंड :  येथील रेल्वे स्थानकावरुन तीन बांगलादेशी नागरिकांना शनिवारी पकडण्यात आले. रॉनी अजय चौैधरी (वय ३0), सूरजित सुजित रॉय (वय ३३), शीलनंद मागोत्रो (वय ४0) अशी या नागरिकांची नावे आहेत. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती येथून तीन बांगलादेशी नागरिक पळाले असल्याचे तसेच ते रेल्वेने प्रवास करण्याची शक्यता बारामती पोलीस ठाण्याकडून दौंड पोलिसांना कळविण्यात आली होती. त्यानंतर दौैंड शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी रेल्वे स्थानकात सापळा लावला. त्यानुसार शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला तीनही बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. आयपीएस अधिकारी सौैरव अग्रवाल, रेल्वे पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पकडलेल्या तीन नागरिकांची पोलिसांकडून कसून चौैकशी सुरू आहे.  

Web Title: Three Bangladeshi person who escaped from Baramati arrested in daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.