अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 08:50 PM2019-07-02T20:50:36+5:302019-07-02T20:52:13+5:30

 पोलीस कर्मचारी संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते.

theft in Police house ! three lakh and 50 thousands materials theft | अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

अबब..! पोलिसाच्या घरातच झाली चोरी...! रोख रक्कमेसह साडे तीन लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस कर्मचारी पालखी ड्युटीवर गेल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

इंदापूर : इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस जवाच्या घरी चोरांनी चोरी करून जवळपास साडे तीन लाख रुपयांचे सोने व पैसे लंपास केल्याची घटना सोमवार ( दि. १ ) रोजी घडली आहे. चोरांचा पोलिसांच्या घरी चोरी करण्याची हिंमत पाहून इंदापूर तालुक्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे, आणि प्रत्येक जण म्हणतो आहे, अबब.. पोलिसाच्या घरीच चोरी...! 
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, इंदापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पांडुरंग नरळे ( वय २८) रा. अंबिकानगर, अंबिका आपार्टमेट, इंदापूर ता. इंदापूर जि. पुणे हे त्या ठिकाणी सपत्नीक भाड्याने राहत असून, त्यांची पत्नी त्यांच्या मुळ गावी पर्यती ता.माण जि.सातारा याठिकाणी सुट्टीसाठी गेले आहेत. 
 नरळे हे २८ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून पासून संत तुकाराम महाराज पालखी बंदोबस्त ड्युटीस गेले होते. त्यांचाच फायदा घेत चोरट्यांनी चोरी केली आहे. दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७. ३० त्यांच्या अपार्टमेंट मधील डॉ. माने यांनी त्याचे मोबाईलवरुन नरळे कळविले की तुमचे घराचे दार उघडे आहे. त्यावेळी नरळे उंडवडी सुपे येथून पालखी बंदोबस्त करुन लागलीच इंदापुर येथे आले. त्यावेळी त्यांनी घराची पाहण केली असता त्यांना त्यांच्या घराचे दार उघडे दिसले म्हणुन त्यांनी घरात जावुन पाहीले तर घरातील लोखंडी कपाटातील सामान
अस्थाव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी कपाटाची बारकाईने तपासणी केली असता, त्यांनी घरात ठेवलेले कपाटातील रोख रक्कम ९ हजार ५०० रुपये तसेच सोन्या चांदिचे दागिने दिसुन आले नाहीत. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या रहात्या घराचे कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करुन घरातील रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने घरफोडी चोरी करुन चोरुन नेले आहेत. त्यामध्ये चोरीस गेलेले रोख रक्कम व सोन्याचांदीचे १ लाख ५० हजार रुपये किंमतीचे सहा तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण, ५२ हजार ५०० रुपये किंमतीचे दोन तोळे एक ग्रॅम वजनाचे बदाम असलेले दोन सोन्याच्या चैन, ५७ हजार ५०० रुपये किंमतीच्या दोन तोळे तीन ग्रॅम वजनाचे त्यामध्ये लहान मोठ्या सहा अंगठ्या दोन बदाम, ३२ हजार ५०० रुपये किंमतीचा एक तोळा तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस, ३० हजार रुपये किंमतीचे एक तोळा दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टाँप्सचे दोन नग, प्रत्येकी ११ मलदार सोन्याचे मणी असलेले लहान बाळाच्या दोन मनगट्या, सोन्याचे सुट्टे मणी, २ हजात ५०० रुपये किंमतीच्या दोन सोन्याचे नथ, ६ हजार रुपये किंमतीच्या अंदाजे पंधरा भार वजनाच्या चांदीचे दागिने त्यामध्ये ब्रेसलेट,चांदीची वाटी, चमचा, चांदीचा करगोटा, मनगटी दोन, जोडवी, व ९ हजार ५०० रुपये रोख रक्कम त्यामध्ये दोन हजार रुपये दराच्या दोन नोटा, ५०० रुपये दराची एक नोट, १०० रुपये दराच्या ५० नोटा असा एकुण ३ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. 
याबाबत ( दि. १ ) रोजी रात्री उशिरा अर्जुन नरळे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राम गोमरे करीत आहेत. 

 

Web Title: theft in Police house ! three lakh and 50 thousands materials theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.