पुण्यातही थायलंड, उझबेकिस्तान..!, हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 03:02 AM2017-11-11T03:02:36+5:302017-11-11T04:24:32+5:30

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी युवतींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील

Thailand, Uzbekistan, also in Pune!, Hyprophilic prostitution business | पुण्यातही थायलंड, उझबेकिस्तान..!, हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय

पुण्यातही थायलंड, उझबेकिस्तान..!, हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय

Next

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय फोफावला आहे. परदेशी युवतींना या व्यवसायात आणण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून शहरातील अनेक भागांत ‘थायलंड, उझबेकिस्तान’ तयार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सुटका केलेल्या परदेशी तरुणींनी आपल्या देशातील गरिबीमुळे या व्यवसायात आल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
अलिकडच्या काळात उच्चशिक्षित तरुणींसोबतच विदेशी तरुणींचा या व्यवसायातील सहभाग लक्षणीयरित्या वाढला आहे. विशेषत: रशिया, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या भागातून आलेल्या तरुणींची या व्यवसायामधून पोलिसांनी केलेली सुटका त्याची प्रातिनिधीक उदाहरणे असून या व्यवसायातील एजंटांकडून कोट्यवधींची उलाढाल केली जाते.
पारंपरिक वेश्याव्यवसायाला गेल्या काही वर्षांत छेद बसला आहे. दक्षिण भारत आणि कोलकाता, बांगलादेश, नेपाळ आदी भागांमधून वेश्याव्यवसायांसाठी मुलींना आणून पुण्यातील वेश्यावस्तीमध्ये विकण्याचे प्रमाण गेल्या वर्षांत घटले आहे. सोशल मीडिया प्रबळ झाल्यापासून ग्राहकांशी वैयक्तिक संपर्क प्रस्थापित करणे अधिकच सोपे झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये देशविदेशामधून शिक्षण, रोजगार आणि पर्यटनाच्या बहाण्याने येणाºया तरुणी या व्यवसायात अलगदपणे ओढल्या जात आहेत. या व्यवसायात असलेल्या पैशाचे आकर्षण या तरुणींना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरत आहे. देशामध्ये हायप्रोफाईल वेश्या व्यवसायांच्या यादीमध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरूनंतर पुण्याचा क्रमांक लागतो.
पुण्यामध्ये कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, येरवडा, खराडीसारख्या भागांमध्ये या व्यवसायाचे प्रमाण अधिक आहे. उत्तम इंग्रजी भाषा अवगत असलेल्या उच्चशिक्षीत तरुणींसह विदेशी तरुणींची मागणी वाढली आहे. पुण्यामध्ये १० ते १२ ‘बडे’ एजंट आणि त्यांचे सहकारी या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. गेल्या वर्षीच पुणे पोलिसांनी या व्यवसायातील माफिया क्वीन असलेल्या कल्याणी देशपांडेवर बेकायदा वेश्याव्यवसायप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. मात्र, अद्यापही बरेचसे एजंट सक्रिय आहेत.
रशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि थायलंड या देशांमधील तरुणींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. बिझनेस, टुरिस्ट आणि स्टुडंट व्हिसावर आलेल्या काही तरुणी एजंटच्या जाळ्यात अडकतात. या देशांमध्ये असलेली कमालीची गरिबी आणि भारतामध्ये या व्यवसायामधून मिळणारा बक्कळ पैसा पाहता या तरुणी स्वाभाविकच या व्यवसायाकडे आकर्षित होतात. एजंटांकडून त्यांना मिळणाºया ‘आॅफर्स’ स्वीकारल्यानंतर या तरुणींना विविध एजंटांकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने देशभरात फिरवले जाते. अगदी पाच हजारांपासून या तरुणींचे दर ठरवले जातात.
पुण्यामध्ये वाढलेला ‘उद्योग व्यवसाय’ आणि जमिनींच्या व मालमत्तांच्या खरेदी-विक्रीमधून खुळखुळत असलेल्या पैशामुळे या व्यवसायाला अधिकच ग्राहक मिळू लागले आहेत. विशेषत: लक्षाधिश आणि कोट्यधीश कुटुंबातील ग्राहकांकडे एजंटांचे अधिक लक्ष असते.
इंटरनेटवर हजारो वेबसाईट्सच्या माध्यमातून एजंट्सचे मोबाईल क्रमांक सहज उपलब्ध होत आहेत. या वेबसाईट्सवर त्यांच्याकडे उपलब्ध तरुणींची छायाचित्रेही अपलोड केलेली असतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्यापर्यंत पोचणे अधिक सोपे झाले आहे. ग्राहकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधताच त्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर तरुणींची छायाचित्रे पाठविली जातात. हा संपर्क वैयक्तिक आणि सुरक्षित असल्यामुळे ९९ टक्के घटनांमध्ये पोलिसांपर्यंत माहितीच पोहचत नाही. त्यामुळे कारवाईमध्येही मर्यादा येत आहेत. कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या व्यवसायामधून एजंट आणि त्यांचे बगलबच्चे चांगलेच गब्बर झाले आहेत.


‘थाई’ मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
‘थाई’ मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. थायलंडमधील तरुणींना या पार्लरमध्ये ठेवले जाते. पार्लरमध्ये आलेल्या ग्राहकांना उत्तेजित करून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी हजारो रुपये घेतले जातात. सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या दहा महिन्यांत अशा मसाज सेंटरवर कारवाई करीत थायलंडच्या १० तरुणींची सुटका केली आहे.

रशिया विभक्त झाल्यानंतर
निर्माण झालेल्या कझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान या देशांमध्ये प्र्रचंड गरिबी निर्माण झाली आहे. या देशांमध्ये सध्या रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तेथील तरुणींना जाळ्यात ओढले जाते. या तरुणींना सहा महिन्यांच्या टुरिस्ट व्हिसावर भारतामध्ये आणले जाते. या देशांमधील अनेक एजंट दिल्लीमध्ये स्थिरावलेले आहेत. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. या तरुणींना त्यांच्या गावामध्येच सहा महिन्यांचे पैसे आगाऊ दिले जातात. त्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये आणले जाते. त्यांचा पासपोर्ट काढून घेतला
जातो. तेथून त्या विविध मेट्रो सिटीमधल्या एजंटांकडे पुरविल्या जातात. ही संपूर्ण साखळी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करते आहे.
 

Web Title: Thailand, Uzbekistan, also in Pune!, Hyprophilic prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.