दहा मिनिटांचा प्रवास तासावर, खडकी-बोपोडी रस्ता, प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचा होतोय त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:38 AM2017-09-11T02:38:59+5:302017-09-11T02:39:45+5:30

पिंपरी-चिंचवडमधून सुखकर प्रवास करून पुणे महापालिका हद्दीची चाहूल लागताच सुरू होतोय जिवावर बेतणारा प्रवास. निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपासून सकाळ-संध्याकाळ खडकी स्टेशनपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मागील अनेक वर्षांपासून या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

 Ten minutes of journey hour, Khadki-Bopodi road, due to lack of proper administration of administration, traffic constraints can cause trouble | दहा मिनिटांचा प्रवास तासावर, खडकी-बोपोडी रस्ता, प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचा होतोय त्रास

दहा मिनिटांचा प्रवास तासावर, खडकी-बोपोडी रस्ता, प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडीचा होतोय त्रास

Next

 खडकी : पिंपरी-चिंचवडमधून सुखकर प्रवास करून पुणे महापालिका हद्दीची चाहूल लागताच सुरू होतोय जिवावर बेतणारा प्रवास. निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपासून सकाळ-संध्याकाळ खडकी स्टेशनपर्यंत होणाऱ्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मागील अनेक वर्षांपासून या वाहतूककोंडीने वाहनचालक त्रस्त झाले असून, दहा मिनिटांच्या प्रवासासाठी सुमारे दोन-दोन तास या वाहतूककोंडीत अडकून पडत कित्येकदा तर याच ठिकाणी खासदार, मंत्री यांनासुद्धा वाहतूककोंडीचा फटका बसला.
महापालिकेने आणि वाहतूक पोलिसांनी त्या वेळेस तत्परता दाखवून काही दिवसांनी पुन्हा तीच अवस्था या ठिकाणची आहे. वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास पोलीस आणि महापालिका प्रशासन कमजोर पडत आहे. कधी एकदाची या समस्येमधून सुटका होईल असा प्रश्न या ठिकाणावरून वर्षानुवर्षे प्रवास करणाºया वाहनचालकांनी केला आहे.
रहिवाशांना भाडेकरूंना प्रशासनाने घरे देऊनही काही रहिवासी त्या ठिकाणीच राहतात. त्यांच्या मागण्या प्रशासनाला मान्य नसल्यामुळे या वस्तीमुळेच या चौकात वाहतूककोंडी होत आहे. बोपोडीत अनेक नेत्यांनी या वस्तीमधील रहिवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. जोपर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारी ही घरे काढणार नाही, तोपर्यंत तरी येथील समस्या सुटू शकत नाही.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोपोडी रेल्वे क्रॉसिंग ते अंडी उबवणी केंद्र चौक हा दीड किलोमीटरचा रस्ता खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमधून जातो. कॅन्टोन्मेंट आणि केंद्र सरकारच्या ब्रिटिशकालीन कायद्यामुळे या दीड किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण रखडले आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत खडकी पोलीस ठाणे चौकात उड्डाणपूल व सर्वत्र विहार चौकात महामार्ग ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग व बोपोडी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर उड्डाणपूल तयार करून घ्यावा, अशी मागणी खडकी बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केली आहे. तसा प्रस्ताव ही बोर्डाच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडून महापालिकेकडे देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप यांनी सांगितले होते. खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील जुन्या इमारती पोस्ट आॅफिस कार्यालय, जयहिंद टॉकीज, खडकी स्टेशनसमोरील काही हॉटेल रुंदीकरणामध्ये जाण्याची शक्यता आहे.

ही आहेत कोंडीची कारणे...

निगडीकडून पुण्याकडे जाताना फुगेवाडीपर्यंत अगदी आरामात जाता येते. मात्र सीएमई, दापोडीपासून अगदी संथ गतीने वाहतूक सुरूअसते. हॅरिस पुलावर व बोपोडी सिग्नलच्या थोड्या अलीकडे जुनी वस्ती आहे. ती वस्ती रस्त्याच्या मध्ये येत असल्यामुळेच सिग्नलच्या दोनशे मीटर अलीकडूनच रस्ता छोटा झाल्यामुळे भर चौकात वाहतूक अडकून पडते. तसेच बोपोडी गावामधून येणारी वाहने नो एन्ट्री असूनही पोलिसांसमोरून बिनदिक्कत येतात. खडकी बाजाराकडून व भाऊ पाटील रस्त्याने नो एंट्रीमधून वाहने येऊन बोपोडी चौकात थबकतात. चारही बाजूंनी चौकात वाहने येत असल्याने नियोजनाअभावी वाहतुकीचा भर चौकातच खेळखंडोबा होतो. योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे. परंतु, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

बोपोडीमधील वाहतूक समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे आहे. मी येथून दररोज प्रवास करतो. मला चिंचवडपासून दापोडीपर्यंत यायला मोजून दहा ते पंधरा मिनिटे लागतात. मात्र दापोडी ते बोपोडी हे पाचशे मीटर अंतर कापण्यासाठी अक्षरश: अर्धा ते पाऊण तास लागतो. या ठिकाणी बोपोडी चौकात वाहतुकीचे नियोजन नसल्याने व रस्त्याला अडथळा ठरणारी छोटी वस्तीमुळे रस्ता चौकातच निमुळता होत जातो. परिणामी वाहनाचा वेग कमी होतो. लवकरात लवकर येथील समस्या प्रशासनाने सोडवावी.
- सुरेंद्र भाटी, व्यापारी

बोपोडीतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. खडकी बाजाराकडून बोपोडीला जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. ते त्वरित करावे व रस्ता मोठा करावा. पुणे आणि पिंपरी-चिंचवड, येरवडा, चंदननगर यांना आयटी कंपन्यांनी वेढले असून, मोठ्या प्रमाणात कॉल सेंटरच्या गाड्या आणि दुचाकींवरून आयटीयन्स खडकी बाजार मार्गाचा वापर करत असल्याने दररोज खडकी ते बोपोडी रस्ता जाम असतो.
- धर्मेश शहा, सामाजिक कार्यकर्ता

Web Title:  Ten minutes of journey hour, Khadki-Bopodi road, due to lack of proper administration of administration, traffic constraints can cause trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.