इमारतीचे दगड निखळू लागले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंबेडकर भवनातील प्रकार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:34 AM2017-09-12T03:34:08+5:302017-09-12T03:34:18+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारतीचे दगड निखळू लागल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कधीही अचानक दगड पडण्याच्या शक्यतेने या इमारतीच्या बाजूने जाण्याची विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना भीती वाटू लागली आहे.

The stones of the building began to fade, Savitribai Phule, Pune University, Ambedkar Bhavanate type | इमारतीचे दगड निखळू लागले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंबेडकर भवनातील प्रकार  

इमारतीचे दगड निखळू लागले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आंबेडकर भवनातील प्रकार  

Next

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या इमारतीचे दगड निखळू लागल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कधीही अचानक दगड पडण्याच्या शक्यतेने या इमारतीच्या बाजूने जाण्याची विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना भीती वाटू लागली आहे.
विद्यापीठामध्ये दगडी बांधकाम असलेली आंबेडकर भवनाच्या इमारतीमध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान आदी विभाग आहेत. राज्यशास्त्र विभागाच्या कार्यालयाच्या वरील बाजूकडील कोपºयावरचे दगड काही दिवसांपासून निखळू लागले आहेत. याची तक्रार विद्यार्थी व प्राध्यापकांनी इस्टेट विभागाकडे केली आहे. त्याचबरोबर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याही निर्दशनास ही बाब आणून देण्यात आली आहे. मात्र तरीही अद्याप दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दगड निखळू लागल्याच्या ठिकाणा शेजारून अनिकेत कॅन्टीनकडे जाण्याचा रस्ता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सातत्याने या ठिकाणाहून ये-जा सुरू असते.

दुरुस्ती सुरू करणार
आंबेडकर भवन इमारतीच्या दगड निखळलेल्या ठिकाणाची मंगळवारपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इस्टेट विभागाचे कार्यकारी अभियंता आर. व्ही. पाटील यांनी दिली.

Web Title: The stones of the building began to fade, Savitribai Phule, Pune University, Ambedkar Bhavanate type

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे