घर भाडे करारासाठी मुद्रांक नोंदणीच कायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 12:57 PM2018-05-02T12:57:35+5:302018-05-02T12:57:35+5:30

सदनिका मालक व भाडेकरी काही अटी व शर्थी शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु,त्याला कायदेशीर आधार नाही.

Stamp registration is legal for house rent agreement | घर भाडे करारासाठी मुद्रांक नोंदणीच कायदेशीर

घर भाडे करारासाठी मुद्रांक नोंदणीच कायदेशीर

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाकडे अत्यल्प शुल्क भरून करार करणे अपेक्षित मुद्रांक शुल्क विभागाने आॅनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरू सदनिकेवर दावा दाखवू शकतो, सदनिका मालकांचा समज

पुणे : सदनिका मालक व भाडेकरी यांच्यात केला जाणारा भाडे करार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे मुद्रांक शुल्क भरून करणे कायदेशीर असून त्यासाठी विभागाने आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अत्यंत कमी शुल्क भरून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येतो. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या सुविधेचा लाभ घेवून भाडे करार करावे,असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी केले.
राज्यातील लहान मोठ्या शहरामध्ये नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने आलेले नागरिक व विद्यार्थी भाडे तत्त्वावर सदनिका घेतात. त्यासाठी सदनिका मालक व भाडेकरी काही अटी व शर्थी शंभर किंवा पाचशे रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून करार करतात. परंतु,त्याला कायदेशीर आधार नाही. त्यामुळे नागरिकांनी मुद्रांक शुल्क विभागाकडे अत्यल्प शुल्क भरून करार करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच मुद्रांक शुल्क विभागाने आॅनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिला आहे. ही सुविधा आॅनलाईन असल्याने नागरिकांना मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही,असेही कवडे यांनी सांगितले.
मुद्रांक शुल्क भरून करार केल्यास भाडेकरू एखाद्या सदनिकेवर दावा दाखवू शकतो, असा चुकीचा समज सदनिका मालकांनी करून घेतला आहे. भाडेकरूने ११ किंवा १२ महिने आणि ३ वर्ष अशा कितीही कालावधीसाठी भाडे करार केला तरी त्याला संबंधित सदनिकेवर दावा सांगता येत नाही,असे नमूद करून कवडे म्हणाले,मुद्रांक शुल्क विभागातर्फे भाडे करारासाठी घर भाड्याच्या आणि अमानत रक्कमेच्या केवळ ०.२५ टक्के रक्कम रक्कम आकारली जाते. तसेच मुद्रांक विभागाकडून केलेल्या कराराला कायदेशीर मुल्य आहे.

Web Title: Stamp registration is legal for house rent agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.