गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:17 PM2018-10-03T23:17:28+5:302018-10-03T23:18:12+5:30

बारामतीत आंदोलन : नगरपालिका प्रशासनाचा निषेध

Stabs of Ganesh Mandal's Workers | गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

googlenewsNext

बारामती : येथील नगर परिषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेशमूर्ती कचरा डेपोच्या खड्ड्यात विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी बुधवारी (दि. ३) बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, विरोधी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका इमारतीत ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

याबाबत आंदोलकांनी प्रांताधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आंदोलकांनी निवेदनात केली आहे. तसेच बारामती नगरपालिकेने हजारो मूर्ती जमा करून घेतल्या आहेत. यापैकी पोलिसांकडे ३९८ मूर्ती जमा आहेत. नगरपालिकेकडे असणाºया उर्वरित मूर्ती पोलिसांनी जमा करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी गणेशभक्तांची माफी मागावी. या घटनेचा तपास अधिकारी बदलावा, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी गालिंदे यांच्या विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याबाबत ना-हरकतपत्र घेतले असल्याचा दावा केला होता. हे पत्र गालिंदे यांची फसवणूक करून घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या पत्राचा दुरुपयोग करू नये, अशीही मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, बारामती शहरात बुधवारी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट होता. नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदवला.

जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन संबंधित नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी यांची चौकशी करून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Stabs of Ganesh Mandal's Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.