एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस लवकरच धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 09:11 PM2018-04-12T21:11:17+5:302018-04-12T21:11:17+5:30

सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकत विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

ST non-AC sleeper bus will run soon | एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस लवकरच धावणार 

एसटीच्या नॉन एसी स्लीपर बस लवकरच धावणार 

googlenewsNext
ठळक मुद्देएसटी प्रशासन : नियमातून एसटीला सुट दिल्याने लवकरच आरामदायी बसरात्रीच्या वेळी प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य

पुणे : विना वातानुकूलित स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेसची नोंदणी आणि वाहतुकीच्या नियमातून राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) राज्य सरकारने सूट दिली आहे. त्यामुळे लवकरच एसटीच्या विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बस रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. 
राज्यात विना वातानुकूलित स्लिपर बसेसच्या नोंदणीला संमती नाही. एसटी महामंडळाच्या बाबतीत ही अट शिथिल करण्यात आली आहे. महामंडळातर्फे लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चालविल्या जातात. रात्रीच्या वेळी प्रवास करण्यास एसटीच्या गाड्यांना प्राधान्य दिले जाते. लांबच्या प्रवासासाठी प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एसटीमध्ये स्लिपर कोच गाड्या आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही वातानुकूलित स्लिपर (एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. मात्र, सर्वसामान्यांना परवडण्याच्या दृष्टीने एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकत विना वातानुकूलीत स्लिपर (नॉन एसी स्लिपर) बसेस महामंडळाच्या ताफ्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महामंडळाने या प्रस्तावास आधीच मान्यता दिली आहे. राज्यात अशा गाड्यांना नोंदणी मिळत नसल्याने तांत्रिक अडचण होती. पण प्रवाशांची गरज लक्षात घेऊन परिवहन विभागाने १३ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या पत्रानुसार राज्य सरकारने एसटी महामंडळास नियमातून सवलत दिली. आता विना वातानुकूलित स्लिपर बसेसची बांधणीही महामंडळाने सुरु केली आहे. त्यामुळे एसटीच्या ताफ्यात लवकरच या बस दाखल होतील, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: ST non-AC sleeper bus will run soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.