दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचवले 12 हजार नागरिकांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 05:28 PM2018-08-22T17:28:49+5:302018-08-22T17:31:12+5:30

लष्कराच्या दक्षिण कमांडच्या जवानांनी केरळ येथील पूरग्रस्तांना राहत तसेच मदत देत जवळपास १२ हजार ५०० नागरिकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे.

southen command soldiers saves lives of 12 thousand people | दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचवले 12 हजार नागरिकांचे प्राण

दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचवले 12 हजार नागरिकांचे प्राण

Next

पुणे : मुसळधार पाऊस व पुरामुळे प्रचंड वित्त व जीवितहानी सोसावी लागलेल्या केरळमध्ये विविध संस्थांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. यात एनडीआरएफ, सामाजिक संस्था तसेच प्रामुख्याने लष्करी जवान सर्वाधिक मदतकार्यात पुढे आहे. या मदतकार्यादरम्यान लष्कराच्या दक्षिण कमांडच्या जवानांनी पूरग्रस्तांना राहत तसेच मदत देत जवळपास १२ हजार ५०० नागरिकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले आहे. या सोबतच रस्ते आणि पुलांची कामे करून दळवळण पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न लष्करातर्फे करण्यात येत आहे.


    प्रचंड पुरामुळे केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या पुरामुळे जवळपास ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर लाखो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ, लष्कर, सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. आतापर्यंत लाखो बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. लष्कराचे जवान बचतकार्यात सर्वाधिक पुढे आहेत. जवानांचे बचतकार्याचे व्हिडीओ सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहेत. या बचतकार्यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जवान आघाडीवर आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ७० टीम तसेच १३ टास्क फोर्सद्वारे बचतकार्य सुरू आहे. या बरोबरच रस्तेबांधणी आणि पुलबांधणीही या जवानांनी हाती घेतली आहे. आतापर्यंत जवळपास १२ हजार ५०० लोकांना दक्षिण मुख्यालयाच्या जवानांनी वाचविले आहे. 


      आतापर्यंत अंदाजे २६ पुलांचे तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम करण्यात आले आहे. तसेच ५० रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. यामुळे बचतकार्य आणखी वेगाने करणे शक्य होत आहे.  दक्षिण मुख्यालयाचे कमांडन्ट लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी यांनी पूरग्रस्त परिसराची पाहणी केली. तसेच जवानांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, ज्या परिसरात हेलिकॉप्टरद्वारे पोहोचनेही कठीण आहे, अशा परिसरात जवनांनी जाऊन मदतकार्य राबविले आहे. या जवानांचा मला अभिमान आहे, हे बचतकार्य आम्ही सुरूच ठेवणार आहोत. स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या बचतकार्यात इतरही अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. त्यांचे कार्यही कौतुकास्पद आहे.

Web Title: southen command soldiers saves lives of 12 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.