पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 03:53 PM2018-08-25T15:53:25+5:302018-08-25T15:54:21+5:30

केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अाता पुण्यातील पथारी व्यावसायिक सुद्धा पुढे अाले अाहेत. या पूरग्रस्तांना या व्यावसायिकांकडून कपडे पाठविण्यात येणार अाहेत.

Social awareness of street vendors ; Help to Kerala flood victims | पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

पथारी व्यावसायिकांची सामाजिक जाणीव ; केरळ पूरग्रस्तांना करणार मदत

googlenewsNext

पुणे : केरळमध्ये अालेल्या संकटावर देशभरातून मदतरुपी मात करण्यात येत अाहे. प्रत्येकव्यक्ती, संस्था अापअापल्या पद्धतीने केरळच्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत अाहे. त्यात अाता पुण्यातील प्रथारी व्यावसायिकांनी सुद्धा वाटा उचलला अाहे. हातावरचं पाेट असलं तरी अापण भारतीय अाहाेत अाणि या नात्याने अापल्या केरळच्या बांधवांना मदत केली पाहिजे या विचाराने शिवराय विचार पथारी संघटनेतर्फे केरळमधील शंभर पूरग्रस्त कुटुंबांना कपडे पाठविण्यात येणार अाहेत. या मदतीचे स्वरुप अधिक व्यापक करण्यासाठी संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी  मदत फेरी सुद्धा काढण्यात अाली. 

    गुरुजी तालीम मंदिरापासून या मदत फेरीचा प्रारंभ झाला. तेथून लक्ष्मी रस्ता, शगुन चौक मार्गे मंडईतील लोकमान्य पुतळयाजवळ या रॅलीचा समारोप झाला. या मदत रॅलीमध्ये रोख रक्कम, कपडे आणि अन्य जीवनावश्यक वस्तू स्वीकारण्यात आल्या. यावेळी लक्ष्मी रोड परिसरातील नागरिकांसह व्यापाऱ्यांनी देखील विविध स्वरूपात मदत केली. ही सर्व मदत पुणे येथील एफ.टी.आय.आय अर्थात फिल्म ॲन्ड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये केरळच्या विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या मदत केंद्राकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

Web Title: Social awareness of street vendors ; Help to Kerala flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.