... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 12:09 PM2019-05-08T12:09:15+5:302019-05-08T12:17:11+5:30

असेच काम स्वच्छतेचे होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको..

So do not be surprised in city's number of last one place in the clean-up competition | ... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त

... तर मग स्वच्छता स्पर्धेत शहराचा क्रमांक शेवटून पहिला आला याचे आश्चर्य वाटायला नको : उपमहापौर संतप्त

Next
ठळक मुद्देसहायक आयुक्तांसमवेत केली पाहणी : करदात्यांच्या पैशांचा अपव्ययपालिकेच्या कामात शिस्त नाही. स्वच्छतेचे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे

पुणे: उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मंगळवारी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्यासमवेत आपल्या प्रभागात फिरून त्यांना स्वच्छतेच्या कामातील अनेक त्रुटी दाखवल्या. असेच काम होत असेल तर मग शहराचा क्रमांक स्पर्धेत शेवटून पहिला आला तर आश्चर्य वाटायला नको अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. मोळक यांनी नंतर सर्व क्षेत्रीय कार्यालयांना परिपत्रक पाठवून या त्रुटी त्वरीत दूर करण्याचे आदेश दिले.
गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत स्पधेर्साठी ही तयारी सुरू आहे. मागील वेळी या स्पर्धेत पालिकेला फटका बसला होता. त्यामुळे यावेळी जय्यत तयारी सुरू आहे. उपमहापौर डॉ. धेंडे यांनी खुद्द मोळक यांनाच आपल्या येरवडा भागातील प्रभागामध्ये विविध गल्लीबोळ फिरून दाखवत काम कसे चालते याचे दर्शन घडवले. 
सरकारी वसाहतींमधील कचरा वेळेवर उचलला न जाणे, रस्त्यांची स्वच्छता काळजीपूर्वक होत नसल्याने दोन्ही बाजूंनी कचरा साचणे, रस्त्यांवर ठिकठिकाणी कचºयाचे ढिग दिसणे, मोकळ्या जागांवर सार्वजनिक ठिकाणी फेकलेला कचरा उचलला न जाणे अशा बºयाच गोष्टी या पाहणीमध्ये उपमहापौर व मोळक यांच्या निदर्शनास आल्या. काही ठिकाणी अपेक्षित असलेले कर्मचारीच उपस्थित नव्हते, काहीजण होते पण कामच करत नव्हते असेही त्यांना आढळले.
त्याचबरोबर आरोग्य निरीक्षकांकडून रस्त्यावर कचरा करणाºयांवर काहीही कारवाई केली जात नाही. कार्यक्रमांमध्ये जेवणावळी घातल्या जातात व त्याचे खरकटे रस्त्यावर मोकळ्या जागांवर टाकले जाते, अशा वेळी संबधितांची भेट घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली तर पुढील वेळी अशा गोष्टींना आळा बसेल, मात्र ही कारवाई होतच नाही असे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
मोळक यांनी या सगळ्याची दखल घेत फक्त येरवडाच नाही तर सर्वच क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक परिपत्रक त्वरीत जारी केले. त्यात त्यांनी या सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. तसेच कर्मचारी हजेरी, त्यांचे काम यांची कधीही अचानक तपासणी केली जाईल, कामात कुचराई दिसल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. रस्त्यावर कायमस्वरूपी पडून असलेल्या वाहनांबाबतही अतिक्रमण विरोधी विभागाशी संपर्क साधून या वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना मोळक यांनी दिल्या आहेत. 

......

करदात्यांच्या पैशांचा अपव्यय
पालिकेच्या कामात शिस्त नाही. स्वच्छतेचे काम काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, कारण याचा सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याशी थेट संबध असतो. कर्मचाºयांना व त्यांच्यावर देखरेखीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या विषयाची गांभीर्य नाही. पालिका फक्त कचरा व्यवस्थापनावर कोट्यवधीचा खर्च करत असताना त्याचा काही उपयोग होत नसेल तर ते अयोग्य व करदात्यांच्या पैशांचा अपव्यय करणारे आहे.
डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर,

Web Title: So do not be surprised in city's number of last one place in the clean-up competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.