स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे ताे गुन्हा हाेत नाही : माधव भंडारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 08:04 PM2019-04-16T20:04:22+5:302019-04-16T20:11:06+5:30

अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काय गुन्हा नव्हे, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इरणींचे समर्थन केले.

smriti irani made a mistake but that's not a offence : madhav bhandari | स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे ताे गुन्हा हाेत नाही : माधव भंडारी

स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे ताे गुन्हा हाेत नाही : माधव भंडारी

googlenewsNext

पुणे : अर्ज दाखल करताना स्मृती इराणींनी त्यांची मागील चूक सुधारली हा काय गुन्हा नव्हे, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी स्मृती इरणींचे समर्थन केले. पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी शहराध्यक्ष याेगेश गाेगावले उपस्थित हाेते. 

स्मृती इराणींनी गेल्या निवडणुकीत पदवीधर असल्याचे आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रात म्हंटले हाेते. तर यंदा अर्ज दाखल करताना त्या पदवीधर नसल्याचे त्यांनी म्हंटले. यावरुन काॅंग्रेसने इराणी यांना चांगलेच घेरले हाेते. मनुष्यबळ विकास मंत्रालय संभाळलेल्या इराणी यांनी खाेटं प्रतिज्ञापत्र गेल्यावेळी दाखल केल्याची टीका काॅंग्रेसकडून करण्यात आली. यावर आज भंडारी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी इराणी यांनी गेल्यावेळी प्रतिज्ञापत्र भरत असताना त्यांची चूक झाल्याचे भंडारी यांनी मान्य केले. परंतु ही चूक म्हणजे काय गुन्हा नव्हे असे म्हणत त्यांनी इराणी यांची पाठराखण केली. तसेच एका निवडणूकीत साेनिया गांधी यांनी काेलंबिया विद्यापीठातून पदवीधर असल्याचे म्हंटले हाेते. परंतु त्या काेलंबिया नावाच्या एका इंन्स्टिट्यूटमधून त्यांनी एक काेर्स केला हाेता. त्यावेळी काॅंग्रेसने ती प्रिंटींग मिस्टेक असल्याचे म्हंटले हाेते. असे म्हणत भंडारी यांनी काॅंग्रेसवर पलटवार केला. 

राज ठाकरेंबाबत बाेलताना भंडारी म्हणाले की राज ठाकरे यांना लाेक गांभिर्याने घेत नाहीत. त्यांना साधा उमेदवार मिळणे सुद्धा अवघड झाले आहे. ठाकरेंच्या सभांना लाेक मनाेरंजन म्हणून पाहतात. ठाकरेंच्या भूमिका सतत बदलत असतात. मागच्या निवडणुकीत ते माेदींचे गुणगान गात हाेते. 

दरम्यान भंडारी यांच्या उपस्थितीत पुणे काॅंग्रेसचे सेक्रेटरी मंगेश खराटे यांनी भाजपात प्रवेश केला. उद्या भाजपकडून पुण्याच्या जाहीरनामा प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

15 वर्ष सत्तेत असूनही केवळ चारपानी पुण्याचा जाहीरनामा काॅंग्रेसने तयार केला आहे, अशी टीका याेगेश गाेगावले यांनी काॅंग्रेसवर केली.  

Web Title: smriti irani made a mistake but that's not a offence : madhav bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.