धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 03:50 PM2022-01-07T15:50:50+5:302022-01-07T15:52:15+5:30

मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून ती निघून गेली

shocking news in pune the mother murder his two child | धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

धक्कादायक घटना! आईनेच पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून केला खून

googlenewsNext

पुणे : रागाच्या भरात पोटच्या दोन चिमुकल्यांचा रस्सीने गळा आवळून आईनेच खून केला असल्याची घटना मुळशी तालुक्यातल्या शिरवली येथे घडली आहे. पोटच्या मुलांचा निर्दयीपणे खून करून जन्मदाती आई निघून गेली. सदर प्रकाराबाबत तिच्या नवऱ्याने पौडपोलिसांमध्ये तक्रार दिली. हा प्रकार समजताच पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही तासात खुनी आईला पोलिसांनी लोणावळा येथून ताब्यात घेतले.
    
आरोपीचा पती संजय जगन्नाथ सोलंकी (वय २५ वर्षे, रा. मुळशी ) याने फिर्याद दिली आहे. पौड पोलीसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार ५ जानेवारीला दुपारी आरोपी पूना संजय सोलंकी (वय २४ वर्ष) हिने रागाच्या भरात मोठी मुलगी चंदा संजय सोलंकी (वय ३ वर्षे ६ महिने) व मुलगा आनंद संजय सोलंकी (वय २ वर्षे) यांचा रस्सीने गळा दाबून खून केला. त्यानंतर मुलांचे मृतदेह उंच वाढलेल्या गवत व झाडा झुडपात टाकून निघून गेली. या प्रकाराबाबत पौड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पूना हिला लोणावळा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय ढोले यांनी भेट दिली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ हे करत आहेत. 

Web Title: shocking news in pune the mother murder his two child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.