पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 07:47 PM2018-09-15T19:47:29+5:302018-09-15T19:49:30+5:30

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए)शनिवारी सकाळी गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या एका खासगी बसवर कारवाई करण्यात आली.

Seven lakhs of gakka seized in Pune | पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त 

पुण्यात सात लाखांचा गुटखा जप्त 

Next
ठळक मुद्देपुण्यासह राज्यात बहुतेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री

पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे (एफडीए)शनिवारी सकाळी गुटख्याची अवैध वाहतूक करणा-या एका खासगी बसवर कारवाई करण्यात आली. एफडीएच्या अधिका-यांनी बसमधून ७ लाख ४८ हजार ९२ रुपयांचा गुटखा जप्त केला. 
राज्यात गुटखा बंदी असूनही पुण्यासह राज्यात बहुतेक ठिकाणी गुटख्याची अवैध विक्री केली जात आहे.पुण्यात कर्नाटकसह इतर राज्यातून गुटख्याची वाहतूक केले जाते. एफडीएकडून कमी अधिक प्रमाणात गुटख्यावर कारवाई केली जाते. शनिवारी (दि. १५)सकाळी संगमवाडी येथील एका खासगी बसमधून गुटखा आणला जात असल्याची माहिती एफडीएच्या अधिका-यांना समजली.त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी एस.जी.घाटोळे यांनी संगमवाडी येथे गुटखा वाहतूक करणा-या बसवर कारवाई केली.
घाटोळे म्हणाल्या,सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.बसबधून सात ते आठ प्रकराच्या गुटख्याचे बॅक्स आणले होते.गुटखा जप्त करून संबंधित गाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.
दरम्यान,गेल्या काही महिन्यांपासून ट्रक किंवा टॅम्पोच नाही तर आता खासगी बसबधून सुध्दा गुटख्याची कारवाई केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे एफडीएला खासगी बसमधील वाहतूकडेही लक्ष द्यावे लागत आहे.

Web Title: Seven lakhs of gakka seized in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.