कर्जमाफी लाभार्थ्यांची दुसरी यादी लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:13 AM2017-11-25T01:13:38+5:302017-11-25T06:54:34+5:30

पुणे : शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक त्रुटींमुळे अद्यापही पूर्णपणे लाभ मिळू शकलेला नाही.

Second list of beneficiaries of debt waiver | कर्जमाफी लाभार्थ्यांची दुसरी यादी लवकरच

कर्जमाफी लाभार्थ्यांची दुसरी यादी लवकरच

googlenewsNext

पुणे : शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक त्रुटींमुळे अद्यापही पूर्णपणे लाभ मिळू शकलेला नाही. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण असून येत्या दोन दिवसांत लाभार्थ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता सहकार विभागातील सूत्रांनी दिली.
सहकार विभागाचे अधिकारी दिवसरात्र यासाठी कष्ट घेत आहेत. माहिती तंत्रज्ञान विभागालाही अधिकाधिक गतीने द्वितीय यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात मंत्रालयामधून सूचना देण्यात आल्या आहेत. दुसºया टप्प्यातील यादी अंतिम करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पहिल्या यादीमधील त्रुटी दुरुस्त करण्यासंदर्भात आयटी विभागाने सहकार विभागाला यादी पाठविली होती. दुरुस्त करण्यात आलेली यादी आयटी विभागाकडे पाठविण्यात आली असून पहिली यादी निर्दोष झाल्याने शेतकºयांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील हिरव्या यादीमध्ये दोन लाख ३९ हजार ७७ शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी सुमारे ८९९ कोटी रुपये आयसीआयसीआय बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. आतापर्यंत एक लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. या शेतकºयांच्या खात्यांवर ४९० कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत. गेल्या काही दिवसांत ४५ कोटी ३ लाख रुपये आणखी शेतकºयांच्या खात्यावर झाले असून पात्र लाभार्थी शेतकºयांची संख्या ४७ हजार ६६३वर पोहोचली आहे. सोमवारपर्यंत पहिल्या यादीतील आणखी शेतकºयांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणे अपेक्षित असल्याचे झाडे यांनी सांगितले.
येत्या काळात हिवाळी अधिवेशन होणार असल्याने विरोधकांच्या टीकेला सरकारला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी अधिकाधिक शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Web Title: Second list of beneficiaries of debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे