सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 08:26 PM2017-12-05T20:26:26+5:302017-12-05T20:27:13+5:30

पुणे : पासष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात षड्ज या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे.

Savvy short films, talks with giants | सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद

सवाईत लघुपटांचा नजराणा, दिग्गजांशी संवाद

Next

पुणे : पासष्ठाव्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात षड्ज या उपक्रमांतर्गत संगीतातील मान्यवरांवर आधारित लघुपट पाहण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. त्याचबरोबर अंतरंग या कार्यक्रमातून महोत्सवात सादरीकरण करणा-या काही कलाकारांशी संवादही साधता येणार आहे. येत्या १३ ते १५ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते १२ या वेळेत सवाई गंधर्व स्मारकामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना यंदाच्या वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौैरवले जाणार आहे.

बुधवारी १३ डिसेंबर रोजी षड्ज अंतर्गत भास्कर राव दिग्दर्शित म्युझिक आॅफ इंडिया, प्रमोद पाटी दिग्दर्शित रवी शंकर, एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्यावरील लघुपट दाखवण्यात येणार आहेत. १४ डिसेंबर रोजी प्रजना परिमिता पराशेर दिग्दर्शित पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील माहितीपट, १५ रोजी रजत कपूर दिग्दर्शित तराना आणि पी. के. साहा दिग्दर्शित सारंगी - द लॉस्ट कॉर्ड हा लघुपट उपस्थितांना पाहता येणार आहे. 

अंतरंग या उपक्रमांतर्गत १३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. १४ डिसेंबर रोजी ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. श्रीनिवास जोशी हे यावेळी त्यांच्याशी संवाद साधतील. १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, महेश काळे आणि श्रीनिवास जोशी यांच्या स्वरसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हे तिघेही सर्जनाची आव्हाने या विषयावर आपले विचार मांडतील, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसिद्ध प्रकाश चित्रकार सतीश पाकणीकर हेही यावेळी उपस्थित होते.
-----------

पं. नाना मुळे यांना जोशी पुरस्कार
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणा-या कलाकारांना दर वर्षी दिला जाणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तबलावादक पं. नाना मुळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे १३ वे वर्ष आहे. पं. नाना मुळे यांनी अनेक वर्षे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांबरोबरच अनेक दिग्गज कलाकारांना तबल्याची संगत केली आहे.


वाहतूक सेवा
यंदाही रसिकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल या पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक संस्थेने बसेसची विशेष सेवा देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार रमणबाग ते कात्रज, रमणबाग धायरी, मार्गे आनंदनगर, सिंहगड रस्ता, रमणबाग ते कोथरूड डेपो आणि रमणबाग ते कर्वेनगर या मार्गांचा समावेश आहे. याबरोबरच संस्थेने मंडळाकडे बसेसच्या उपलब्धतेबाबत सविस्तर निवेदनही दिले असून बसेसच्या वेळांची माहिती महोत्सवादरम्यान देण्यात येईल.

ग्लोरी आॅफ स्ट्रिंग्ज
सतीश पाकणीकर यांच्या अकराव्या छायाचित्र प्रदर्शनामध्ये यंदा तंतुवाद्य वादकांची मांदियाळी रसिकांना पाहायला मिळणार आहे. ग्लोरी आॅफ स्ट्रिंग्ज असे यावर्षीच्या या छायाचित्र प्रदर्शनाचे नाव आहे. असून प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी गेल्या तेहतीस वर्षात वेगवेगळ्या मैफिलीत टिपलेल्या कलावंतांपैकी निवडक अशा सत्तर वादकांचे सादरीकरण करतानाचे भाव पहायला मिळणार आहेत. महोत्सवाच्या काळात न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागच्या आवारात असलेल्या स्वतंत्र मंडपात रसिक या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊ शकतील. 

Web Title: Savvy short films, talks with giants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे