यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 10:04 PM2018-07-10T22:04:15+5:302018-07-10T22:04:56+5:30

कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला..

rice cultivation by the machine is successful | यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी 

यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी 

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभाग : वेल्हे ४० एकरांत प्रयोग 

वाजेघर : भातशेती म्हणजे वर्षभर कष्ट, हे समीकरण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदलत आहे. कृषी विभागाच्या पुढाकाराने वेल्हे तालुक्यात यंत्राद्वारे भात लागवड करून हा प्रयोग राबविण्यात आला. ‘आत्मा’मार्फत पानशेत खोऱ्यातील मौजे पोळे, शिरकोली, ठाणगाव, रूळे, निगडे मोसे, खामगाव व रांजणे येथे ४० एकरांवर अशी लागवड करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रात भात पीक घेतले जाते; मात्र पारंपरिक पद्धतीने आजही भातशेती केली जात असून, वर्षभर काबाडकष्ट करून उत्पन्न चांगले मिळत नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागातर्फे भात शेतीसाठी आधुनिक यंत्राचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून सर्वाधिक उत्पन्न घेतले जात असलेल्या वेल्हे तालुक्यात हा प्रयोग राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब करावा व आपले उत्पन्न वाढवावे, असे आवाहन यावेळी तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे व तंत्रज्ञान व्यवस्थापक नीलेश अबदागिरे यांनी केले.याप्रसंगी पुणे विभागाचे उपायुक्तअजित पवार, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त विनायकुमार आवटी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, जि. प. सदस्य अमोल नलावडे,  प्रकल्प संचालक अनिल देशमुख, भीमराव घोरपडे, अविनाश राठोड, अशोक राठोड, महेश नेवसे, मंगेश तांबडे, डावरे साहेब, अनंता निवंगुणे व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: rice cultivation by the machine is successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.