धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 07:28 AM2017-07-26T07:28:58+5:302017-07-26T07:29:01+5:30

जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारी दिवसभरात ओसरला होता. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खडकवासला

rain, Dam area, pune, | धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला

धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला

Next

पुणे : जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरण पाणलोटक्षेत्रातील पावसाचा जोर मंगळवारी दिवसभरात ओसरला होता. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने खडकवासला, गुंजवणी, कळमोडी, चासकमानसह ९ धरणांतून पाणी सोडण्यात आले.
गेले दोन आठवडे झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.०६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात खडकवासला प्रकल्पातील धरणांत १६.७६ टीएमसी पाणीसाठा होता. वरसगाव धरणक्षेत्रांत मंगळवारी सायंकाळी पाचपर्यंत १०, पानशेत, ८, खडकवासला २ आणि टेमघरला २१ मिलिमीटर पाऊस झाला. टेमघरचा पाणीसाठा १.८९ (५०.९९ टक्के), वरसगाव ८.२२ (६४.०९ टक्के), पानशेत ९.९८ (९३.६७ टक्के) आणि खडकवासला धरण १.९७ टीएमसी इतके पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मंगळवारीदेखील ४०८ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. पुणे शहरातदेखील दिवसभरात पावसाच्या काही सरी पडल्या. सायंकाळी ५ पर्यंत ०.२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद वेधशाळेत झाली.
पिंपळगाव जोगा धरणक्षेत्रात ९, माणिकडोह २, येडगाव ६ आणि वडजला ७ मिलिमीटर पाऊस झाला. येडगाव धरणातील साठा २.७० टीएमसी (९६.५६ टक्के) झाल्याने येथून ३ हजार ७४९ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. कळमोडी परिसरात ११, भामा आसखेड १२, वडिवळे ३२, आंद्रा १५, पवना २८, कासारसाई ५ आणि मुळशी धरणक्षेत्रांत १३ मिलिमीटर पाऊस पडला.

उजनीतील पाणीसाठा १५ टीएमसीवर
जिल्ह्यातील धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात १५.९० (२९.६७ टक्के) टीएमसीपर्यंत वाढ झाली.

Web Title: rain, Dam area, pune,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.