पुणेरी पाट्या; आरसा अभिमानाचा अन् स्पष्टवक्तेपणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:16 AM2018-06-19T01:16:26+5:302018-06-19T01:16:26+5:30

आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही,’ ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये,’ ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते,’ ‘आमची कोठेही शाखा नाही,’ ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत.

Punei Patiala; Mistress pride and clarity | पुणेरी पाट्या; आरसा अभिमानाचा अन् स्पष्टवक्तेपणाचा

पुणेरी पाट्या; आरसा अभिमानाचा अन् स्पष्टवक्तेपणाचा

Next

पुणे : आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही,’ ‘एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये,’ ‘चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते,’ ‘आमची कोठेही शाखा नाही,’ ‘आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही,’ ‘आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल,’ अशा पाट्या दृष्टीस पडू लागल्या, की तुम्ही नक्की पुण्यातच आहात हे सुज्ञास सांगणे न लगे!
पुणेरी पाट्या म्हणजे आमच्या अभिमानाचा आरसाच जणू! होय, पाट्यांमधून झळकतो, पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा, थेट भिडण्याची वृत्ती. पुण्याच्या या अभिमानाचे साक्षीदार होण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर होमिओपॅथी क्लिनिक यांच्या सहयोगाने शनिवार आणि रविवारी ‘पुणेरी पाट्या प्रदर्शन’ आयोजिण्यात आले आहे. ‘खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी’ सहप्रायोजक आहेत. पुणेकर पाट्यांमधून स्वत:च्या व्यंगावर बोट ठेवण्याचं धाडस दाखवतो, चपखल शब्दांमधून मार्मिक टिप्पणीही झळकते याच पाट्यांमधून..! याला वयाचे बंधन नाही, शिक्षणाची अट नाही आणि जातपंथवर्णभेद तर मुळीच नाही. अगदी लहान वयाचा एखादा मुलगाही मार्मिक शब्दात भला मोठा आशय व्यक्त करतो व एखादे वयस्कर आजोबाही या रस्त्यावरचा सिग्नल विमानालाही उपयोगी पडतो असे म्हणू शकतात. पुणेरी काकू एखाद्याची अशी खिल्ली उडवतील, की हास्याचे फवारे उडतील व आजीही नव्या पोरींची अशी फिरकी घेतील, की त्या लाजून चूर होतील. चेष्टा करावी तर त्यातही काही टॅलेंट असावे ही दृष्टी पुणेरी पाट्यांनीच दिली. खडूस, खत्रूड, खवचट व तरीही हवेहवेसे वाटणारे या पाट्यांमधील शब्द अस्सल पुणेकरांची तैलबुद्धी दाखवतात व त्याचा खास पुणेरी बाणाही!
इथला रिक्षावालाही रिक्षाच्या मागे चिकटू नका, मार बसेल असे
लिहून जातो, तर एखादा मालमोटारचालक तेरा मेरा साथ असे १३ मध्ये
मेरा व नंतर ७ असे अंकांत लिहून
मजा आणतो.
>पुणेरी इरसाल पाट्या म्हणजे पुणेकरांचा अभिमान आहे. पुण्याची संस्कृती पुणेरी शैलीत खुमासदार पद्धतीने सांगणारे ते प्रतीक आहे. अशा पाट्या लिहिण्यासाठी आपल्या संस्कृतीचा, वैभवशाली इतिहासाचा जाज्वल्य अभिमानच असावा लागतो. कुत्र्यापासून सावध राहाऐवजी, सावधान, कुत्रा चावरा आहे, असेही इथेच लिहितात. बेल एकदाच वाजवावी, जिना चढताना आवाज करू नये, दरवाजासमोर वाहने लावल्यास पंक्चर केली जातील, अशा मजेशीर रचना म्हणजे मधूनच बरसणारी आनंदाची सरच असते. पुण्याशिवाय अन्यत्र कुठे हा अनुभव येणार नाही.
>पुणेकर जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपली स्वत:ची ओळख निर्माण करतात. अभिमान आहे मला आणि तुम्हाला पुणेरी असल्याचा! हाच अभिमान आता झळाळून निघणार आहे एका अभिनव स्पर्धेतून! तुमच्या खास पुणेरी शैलीत, कानपिचक्या घेणारी, खुमासदार मार्मिक टिप्पणी (की टोमणा?) करणारी हटके पाटी लिहून आमच्याकडे स्र४ल्ली१्रस्रं३८ं2018 @ॅें्र’.ूङ्मे पाठवा. खासमखास पुणेरी पाट्यांना ‘आकर्षक बक्षिसासह लोकमत’मधून यथायोग्य प्रसिद्धी दिली जाईल.

Web Title: Punei Patiala; Mistress pride and clarity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे