पुणे : किरकोळ वादातून मित्रानंच डोक्यात दगड घालून मित्राची केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 10:48 IST2019-02-05T10:47:43+5:302019-02-05T10:48:15+5:30

किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील ही घटना आहे.

Pune : Youth killed his Friend over minor dispute | पुणे : किरकोळ वादातून मित्रानंच डोक्यात दगड घालून मित्राची केली हत्या 

पुणे : किरकोळ वादातून मित्रानंच डोक्यात दगड घालून मित्राची केली हत्या 

ठळक मुद्देभाजी आणण्याच्या वादातून मित्रानंच केली मित्राची हत्यामित्राची डोक्यात दगड घालून हत्या

पुणे - किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली. 

सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील हे दोघेही दारूच्या नशेत होते. यावेळेस दोघांमध्ये भाजी आणण्यावरून  वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.
गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.
 

Web Title: Pune : Youth killed his Friend over minor dispute