केवळ चहा पिताना धक्का लागला म्हणून तरुणाची केली निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 11:32 IST2017-09-18T10:06:49+5:302017-09-18T11:32:19+5:30

पुण्यातील बाणेर परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेते आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

In Pune, a young man killed a sharp weapon by cutting a sharp weapon | केवळ चहा पिताना धक्का लागला म्हणून तरुणाची केली निर्घृण हत्या

केवळ चहा पिताना धक्का लागला म्हणून तरुणाची केली निर्घृण हत्या

पुणे, दि. 18 - केवळ  चहा पिताना धक्का लागल्याच्या कारणावरुन एका तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  पुणे शहरातील बाणेरमध्ये सोमवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, या घटनेते आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

अफसर खान (वय 20 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. अफसर खान हा बाणेरमधील इंदिरानगर वसाहतीतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे तर सलीम सय्यद हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सोमवारी (18 सप्टेंबर) सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास बाणेर रोडवरील सकाळनगर बसस्टॉप जनळ दोन तरुण टपरीवर चहा पित होते. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि वादाचे रुपांतर हत्येत झाले.

क्षुल्लक कारणावरुन चिडलेल्या आरोपीने दोघांवर कुकरीने वार केल्याची माहिती आहे.  घटनेनंतर आरोपी हल्लेखोर पसार झाला आहे. पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: In Pune, a young man killed a sharp weapon by cutting a sharp weapon