पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 05:06 AM2017-12-20T05:06:59+5:302017-12-20T05:07:20+5:30

उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी महानगरपालिकेची नाट्यगृहे उभी राहत आहेत. मात्र, वारजे परिसरात अद्याप एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली जात होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने वारजे उड्डाणपुलालगत ३ एकर जागा सांस्कृतिक वास्तूसाठी आरक्षित केली. मात्र, जागामालकांकडून ही जागा अद्याप ताब्यात मिळाली नसल्याने प्रस्तावित नाट्यगृह रखडले आहे. महानगरपालिकेने जागामालकांना नोटीसही पाठवली आहे.

Pune: When is the 'Third Banner' in the theater? Notice that there is space to get possession, Municipal Corporation notice | पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस

पुणे : नाट्यगृहात ‘तिसरी घंटा’ कधी? जागा असून ताबा मिळेना, महापालिकेकडून नोटीस

googlenewsNext

पुणे : उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी महानगरपालिकेची नाट्यगृहे उभी राहत आहेत. मात्र, वारजे परिसरात अद्याप एकही नाट्यगृह अस्तित्वात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात नाट्यगृह उभारण्याची मागणी केली जात होती. अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने वारजे उड्डाणपुलालगत ३ एकर जागा सांस्कृतिक वास्तूसाठी आरक्षित केली. मात्र, जागामालकांकडून ही जागा अद्याप ताब्यात मिळाली नसल्याने प्रस्तावित नाट्यगृह रखडले आहे. महानगरपालिकेने जागामालकांना नोटीसही पाठवली आहे.
सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात रसिकांना विविध कलांचा आस्वाद घेता यावा, यादृष्टीने पुरेशी नाट्यगृहे उपलब्ध आहेत. येथे नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम, कलादालनांमध्ये चित्रप्रदर्शन अशा विविध उपक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे रसिकांना सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो. कलेचा वारसा अनुभवताना त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होते.
बदलत्या काळाप्रमाणे पुणे शहराचा विस्तार उपनगरांपर्यंत वाढत आहे. उपनगरांमधील रसिकांची सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टीने औंध, येरवडा, हडपसर आदी ठिकाणी महानगरपालिकेने काही नाट्यगृहांचे काम सुरू केले आहे, तर काही ठिकाणी नाट्यगृहे प्रस्तावित आहेत. वारजे परिसरातही नाट्यगृहासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. वारजेजवळील शिवणे, धायरी आदी गावे महापालिकेत समाविष्ट होत आहेत. या भागातील रसिकांच्या सोयीसाठी नाट्यगृह उभे राहावे, यासाठी नगरसेवक दिलीप बराटे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
वारजे उड्डाणपुलाजवळ जागा
सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेने सर्व्हे क्रमांक ९ आणि ११ येथे सांस्कृतिक वास्तूसाठी वारजे उड्डाणपुलाजवळ जागा आरक्षित केली आहे. मात्र, जागामालकांनी ही जागा अद्याप महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेली नाही. महानगरपालिकेने मालकांना एफएसआय अथवा टीडीआर देण्याचा प्रस्तावही पाठवला. मात्र, त्याबाबतही मालकांकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे, महानगरपालिकेतर्फे नोटीस पाठवण्यात आली आहे. याबाबत पालिकेतर्फे लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेवक दिलीप बराटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वारजेतील नागरिकांच्या सोयीसाठी वारजे उड्डाणपुलाच्या शेजारी ३ एकर परिसरात जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, जागामालकांच्या उदासीनतेमुळे नाट्यगृहाचे काम रखडले आहे. पालिकेकडून याबाबत मालकांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याची अपेक्षा आहे.
- दिलीप बराटे,
नगरसेवक

Web Title: Pune: When is the 'Third Banner' in the theater? Notice that there is space to get possession, Municipal Corporation notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.