चोरीचा बनाव रचणार्‍या वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:44 PM2017-11-15T14:44:49+5:302017-11-15T15:29:23+5:30

वाईन शॉपच्या व्यवस्थापकानेच चोरीचा बनाव रचत ५ लाख ६८ हजार रुपये लंपास केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Pune police will action on the manager of the shop who misguide police | चोरीचा बनाव रचणार्‍या वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चोरीचा बनाव रचणार्‍या वाईन शॉपच्या व्यवस्थापकाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देफिर्यादीकडून पोलिसांना दिली जात होती विसंगत माहितीव्यवसायात तोटा आल्याने रचला बनाव

पुणे : राष्ट्रीय  महामार्गापासूनच्या ५०० मीटर आतमधील वाईन शॉप बंद केल्याने व्यवसायात तोटा झाल्याने मॅनेजरनेच आपल्याला लुटल्याचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे़ न्यायालयाच्या आदेशाने वाइन शॉप बंद झाल्याने गेली ४ ते ५ महिने त्यांचा पगार बंद झाला होता़ 
वाईन शॉपची रोकड घेऊन जाणार्‍या दुचाकीस्वाराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून भरदिवसा पावणेसहा लाखांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कर्वेनगर रस्त्यावरील ताथवडे उद्यानासमोर घडली होती़ अलंकार पोलिसांनी केलेल्या तपासात मॅनेजरनेच हा बनाव केल्याचे उघडकीस आले आहे़ 
राकेश लक्ष्मणसिंह परदेशी (वय ३६, रा़ प्रसाद, बिबवेवाडी) असे या मॅनेजरचे नाव आहे़ पोलिसांनी त्याला अटक केली आहे़ 
याबाबत पोलिसांनी सांगितले, की  राकेश परदेशी हे एका वाइन शॉपमध्ये मॅनेजर आहे. शुक्रवार ते रविवार अशी तीन दिवसांची वाइन शॉपची जमा झालेली ५ लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन बँकेत भरण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. दरम्यान, ते ताथवडे उद्यानाजवळ आले असता एका व्यक्तीने त्यांना गाडीचे चाक पंक्चर झाल्याचे खोटे सांगितले. त्यांनी थांबून गाडीवर बसूनच पाठीमागील टायर पंक्चर झाले आहे का याची पाहणी करीत असताना त्या चोरट्याने डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि गळ्यात अडकवलेली काळ्या रंगाची बॅग जबरदस्तीने चोरुन नेली़ परदेशी यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला़ मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला होता़ अलंकार पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिमंडळ एकचे उपायुक्त बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट दिली.
परदेशी हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले, तेव्हापासूनच पोलिसांना ते सांगत असलेल्या घटनाक्रमाबाबत संशय होता़ यापूर्वी चोरट्यांनी डोळ्यात मिरची पावडर टाकली असेल तर त्याचा चेहरा कसा झालेला असतो, हे पोलिसांनी पाहिलेले होते़ तशी कोणतीच निशाणी परदेशी याच्या चेहºयावर दिसत नव्हती़ याशिवाय इतकी मोठी रक्कम चोरीला गेली तरी त्याचा परिणाम त्याच्यावर झाल्याचे दिसून येत नव्हते़ परंतु, तक्रार असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला़  सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. चव्हाण यांनी तपास करताना घटनास्थळी भेट दिली़ त्याने सांगितलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षातील स्थिती यात तफावत दिसून येत होती़ याशिवाय दरवेळी तो वेगवेगळी उत्तरे देत होता़ त्यामुळे खोलात जाऊन चौकशी केल्यावर त्याने आपणच बनाव रचल्याचे कबुल केले़ 
सिंहगड रोडला एका वाइन शॉपमध्ये परदेशी मॅनेजर आहे़ पण, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेली सर्व मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा आदेश दिल्याने त्यांचे दुकान बंद झाले़ त्यामुळे त्यांचा पगारही बंद झाला होता़ त्यामुळे आर्थिक चणचण त्याला जाणवत होती़ त्यातून टीव्हीवर पाहून व बातम्या वाचून त्याने हा लुटीचा बनाव आखला़ वाइन शॉपमधून पैसे घेऊन बाहेर पडल्यानंतर त्याने त्यातील पैसे आपल्या दुसर्‍या खात्यात भरले व त्यानंतर घटनास्थळी येऊन आपल्याला लुटल्याचा आरडाओरडा केला़ पोलिसांनी त्याला अटक केली आहे़.

Web Title: Pune police will action on the manager of the shop who misguide police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.