Pune: काॅलेज परिसरात धिंड काढून डॅनी टोळीची ‘भाईगिरी’ जिरवली; पुणे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:00 AM2023-07-06T10:00:45+5:302023-07-06T10:01:56+5:30

हा सर्व प्रकार आबासाहेब गरवारे कॉलेज परिसरात घडला होता...

pune police By removing the barricade in the college premises, Danny killed the 'brotherhood' of the gang | Pune: काॅलेज परिसरात धिंड काढून डॅनी टोळीची ‘भाईगिरी’ जिरवली; पुणे पोलिसांची कारवाई

Pune: काॅलेज परिसरात धिंड काढून डॅनी टोळीची ‘भाईगिरी’ जिरवली; पुणे पोलिसांची कारवाई

googlenewsNext

पुणे : कोयत्याच्या साह्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या डॅनी टोळीला पोलिसांनी खाक्या दाखवून कॉलेज परिसरातच धिंड काढली. एका प्रकारे उदयाेन्मुख भाईंना डेक्कन पोलिसांनी इशाराच दिला आहे.

कुणाल कानगुडे आणि ओंकार ननावरे ऊर्फ डॅनी या दोघांचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातूनच कुणाल याने डॅनीला कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार आबासाहेब गरवारे कॉलेज परिसरात घडला होता.

याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला कोयता फिरविणाऱ्या कुणाल कानगुडे (वय १९) याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत डॅनी याने आपली टोळी सक्रिय केल्याची माहिती मिळाली. दरम्यान, त्याचा शोध घेत असताना, शिवाजीनगर आणि डेक्कन पोलिसांना ते दरोड्याच्या तयारीत असताना नदीपात्रात मिळून आले. त्यात ८ जणांना अटक करण्यात आली.

Web Title: pune police By removing the barricade in the college premises, Danny killed the 'brotherhood' of the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.