आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:00 AM2018-08-23T03:00:09+5:302018-08-23T03:00:31+5:30

आळंदी नगर परिषदेने मात्र प्रस्तावित हद्दवाढीस विरोध केला आहे.

The proposal for extension of the Alandi Municipal Council | आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव

आळंदी नगर परिषदेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव

googlenewsNext

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी नगर परिषदेची हद्दवाढ करून आळंदी ग्रामीण क्षेत्र आळंदी नगर परिषदेत समाविष्ट करण्यास भविष्यातील नागरीकरणाचा विचार करून हद्दवाढ करण्याची शिफारस खेड तहसीलदार यांनी केली असल्याचा अहवाल पुणे जिल्हा प्रशासनास सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे. आळंदी नगर परिषदेने मात्र प्रस्तावित हद्दवाढीस विरोध केला आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते नीलेश कड यांनी आळंदी नगर परिषद हद्दवाढीसाठी अर्ज करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. यात आळंदी नगर परिषदेच्या बाबत पुणे जिल्हा प्रशासनाने स्थानिक चौकशी करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी खेड तहसीलदार आणि आळंदी नगर परिषद यांच्याकडून चौकशीसह वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविला. यात खेड तहसीलदारांनी आळंदी नगर परिषदेची हद्दवाढ करण्याची गरज भविष्यातील वाढत्या नागरीकरणाची गरज व्यक्त करीत हद्दवाढ करण्याची शिफारस केली आहे. यासाठी जनगणना सन २०११ गृहीत घरून अहवाल दिला आहे. आळंदी व चºहोली खुर्दलगतचे आळंदी ग्रामीणचे क्षेत्र आळंदी नगर परिषदेत समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
आळंदी नगर परिषदेने मात्र हद्दवाढीला विरोध करणारा ठराव केला आहे. मात्र, वाढती लोकसंख्या, नागरीकरण आणि नागरी सुविधांची आळंदी ग्रामीण भागात असलेली वानवा, परिसरातील औद्योगिक क्षेत्र यांचा विचार करून खेडचे तहसीलदार यांनी, ‘आळंदी शहर म्हणून वाढते आहे. यात नागरीकरणाची टक्केवारीदेखील वाढत आहे. त्यामुळे आळंदीची हद्दवाढ करण्याची गरज असल्याचा’ अहवाल दिला आहे.
चौकशीतील पत्राप्रमाणे विविध मुद्द्यांची तपासणी करून आळंदी नगर परिषदेची हद्दवाढीची प्राथमिक उद्घोषणा अधिसूचनेसाठी सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे. आळंदी नगर परिषदेच्या हद्दीत आळंदी ग्रामीणचे क्षेत्र समावेशासाठी अहवाल देण्यात आला आहे. यात आळंदी ग्रामीण हे क्षेत्र महसुली गाव चºहोली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. तसेच, चºहोली खुर्द ग्रामपंचायतीचे महसुली क्षेत्र स्वतंत्र आहे. आळंदीत समाविष्ट होणाऱ्या गावाची लोकसंख्या सन २०११च्या जनगणनेनुसार २५ हजार ५६८ आहे. यात सरासरी अकृषक रोजगाराची टक्केवारी ४५ टक्के आहे. वस्तुस्थितीच्या अहवालात आळंदी नगर परिषद हद्दवाढ करणे इष्ट वाटते, असा अहवाल देण्यात आला आहे.

आळंदी ग्रामीणमध्ये नागरी सुविधांचा अभाव
तीर्थक्षेत्र आळंदीलगत असलेल्या आळंदी ग्रामीण क्षेत्रात नागरीकरण वाढत आहे. मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. आळंदीलगतच्या भागात लोकवस्ती वाढली आहे. मात्र, नागरी सुविधा देण्यास स्थानिक प्रशासन तोकडे पडत आहे. आळंदी ग्रामीण क्षेत्रात नागरी सुविधा मिळत नसल्याने नव्याने विकसित होत असलेल्या नागरी वसाहतीमधील नागरिक तसेच राज्यातून येणाºया भाविकांमध्येदेखील नाराजी आहे. राज्यातील भाविकांनी यात्राकाळात निवाºयाची व्यवस्था व्हावी, यासाठी आपापल्या कुवतीप्रमाणे आळंदीलगतच्या आळंदी ग्रामीण क्षेत्रात जागाखरेदी करून निवाºयाची व्यवस्था केली आहे. मात्र रस्ते,
ड्रेनेज, वीज पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांचा अभाव आहे.

तीर्थक्षेत्र आळंदी शहरासाठी प्रभावी प्रखर निर्णय घेण्याची क्षमता आळंदी नगर परिषद कमिटीत नाही. याचे वाईट परिणाम भविष्यात आळंदी व परिसराच्या नियोजनावर होतील. मात्र, खेडचे प्रांत व तहसीलदार यांनी भविष्याचा वेध घेऊन आळंदी नगर परिषद हद्दवाढ आवश्यक असल्याचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकाºयांना पाठविलेला आहे. या प्रशासकीय निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

Web Title: The proposal for extension of the Alandi Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.