पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 03:09 PM2018-12-28T15:09:06+5:302018-12-28T15:09:57+5:30

तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली.

President of the environment literature sammelan dr.Tara Bhawalkar | पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर 

पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर 

Next

पुणे :  ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या ज्येष्ठअभ्यासक डॉ. तारा भवाळकरयांची निवड करण्यात आली  आहे. १३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि स. प. महाविद्यालय यांच्या वतीने आठव्या ’पर्यावरणस्नेही साहित्य संमेलना’चे आयोजन शनिवार दि. ५ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता  स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंदजोशी, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ आणि किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक विरेंद्र चित्राव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.  याप्रसंगी मसापच्या खजिनदार सुनिताराजे पवार उपस्थित होत्या. 
डॉ. तारा भवाळकर प्रामुख्याने वैचारिक लेखन करणा-या एक मराठी लेखिका आहेत. भवाळकर या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या त्या गाढ्या अभ्यासक आहेत. त्यांनी लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललितलेखन, लोककला आणि लोकसाहित्य या विषयांशी संबंधित अनेक चर्चा, परिसंवाद, संमेलमाध्ये भाग घेतलाआहे. 
    तारा भवाळकरांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशानाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैध्दांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. आपल्या लोकसाहित्यात आणि लोकपरंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते. माणूस आणि निसर्ग यांच्यातील सौदार्हपूर्ण नात्याचे संदर्भ वारंवार येतात. ताराबाइंनी नेहमीच आपल्या लेखनातून त्याचा पुरस्कार केलेला दिसतो.यंदाचे पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन अनेक कार्यक्रमांनी रंगणारआहे. यातील महाविद्यालयीन युवकांचा सहभाग लक्षणीय असून,त्यांच्या पारितोषिक विजेत्या साहित्याचे सादरीकरण होणारआहे. महोत्सवाचा विषय ’लॅस्टिकलानकार, वसुंधरे लाहोकार’हा असून, संमेलनातील विविध ठराव महाविद्यालयीन युवक मांडणार आहेत. 
    संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी  १०.३० वाजता संमेलनाचे उदघाटन होणार असून,  संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर  विद्यार्थ्यांचे पारितोषिकप्राप्त साहित्यवाचन, ’प्लास्टिक प्रदूषणाचा भस्मासूर’ यावर  डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचे व्याख्यान, बाबा परिट (सांगली), आप्पासाहेब खोत (कोल्हापूर) निसर्ग कविता तर उध्दवकानडे (पुणे), कल्पना दुधाळ (उरळीकांचन) शिवारातल्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत.  संंमेलनाचा समारोप साहित्यसंमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणाने होणार आहे. 


 

Web Title: President of the environment literature sammelan dr.Tara Bhawalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.