रक्तचंदन लाकडाची चाेरी करुन विक्रसाठी नेणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:46 PM2018-05-27T17:46:53+5:302018-05-27T17:46:53+5:30

रक्तचंदन लाकडाची अाेंडकी चाेरी करुन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला पाेलीसांनी सापळा रचून अटक केली.

police caught thief of sandal wood | रक्तचंदन लाकडाची चाेरी करुन विक्रसाठी नेणाऱ्याला अटक

रक्तचंदन लाकडाची चाेरी करुन विक्रसाठी नेणाऱ्याला अटक

googlenewsNext

पुणे :  रक्तचंदन लाकडाची तीन लाख साठ हजार रुपयांची 10 अाेंडकी चाेरी करुन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याला पुण्याच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने सापळा रचून अटक केली अाहे. राहुल हरिदास इंगळे (वय30 रा. भूगांव) असे अटक केलेल्या अाराेपीचे नाव अाहे. याप्रकरणी गुन्हे शाखा, युनिट 1 चे पाेलीस नाईक इरफान माेमीन यांनी फिर्याद दाखल केली अाहे. 


    गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक शनिवारी रात्री पेट्राेलिंग करीत असताना त्यांना एक लाल रंगाच्या हुंडाई अाय 10 ही गाडी वनाज कंपनीसमाेर थांबली असून त्या गाडीमध्ये रक्तचंदनाची चाेरीची लाकडे विक्रीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलीस  दाेन पंचांना बराेबर घेऊन खासगी गाडीने वनाज कंपनीकडे गेले. दुरच गाडी लावून मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री केली. त्यानंतर चाेरीचे अाेंडके असलेल्या गाडीवर रात्री 2.05 वाजता छापा टाकून अाराेपीला ताब्यात घेतले. त्याला गाडीची डिगी उघडण्यास सांगितले असता त्याने टाळाटाळ केली. पाेलीसांना संशय अाल्याने त्यांनी गाडीच्या डिग्गीची झडती घेतली असता त्यामध्ये कागदाने पॅक केलेली रक्तचंदनाची वेगवेगळ्या लांबीची 10 अाेंडके मिळून अाली. त्याचे वजन 59 किलाे इतके हाेते. पाेलीसांनी अाराेपीला या अाेंडक्यांबाबत विचारले असता त्याने ही अाेंडकी हैद्राबाद येथील श्रीनिवास या व्यक्तीने दिल्याचे सांगितले. पाेलीसांनी अाराेपीकडून ही अाेंडकी व त्याच्याकडील गाडी ताब्यात घेऊन अाराेपीला अटक केली. 


    ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 1 चे पाेलीस निरीक्षक नितीन भाेसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस उपनिरिक्षक हर्षल कदम, पाेलीस हवालदार रिज़वान जिनेडी, पाेलीस नाईक राहुल इंगळे, सचिन जाधव,  सुधाकर माने यांनी केली. 

Web Title: police caught thief of sandal wood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.