तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’; पोलिस आयुक्तांचे आदेश

By नारायण बडगुजर | Published: March 23, 2024 01:52 PM2024-03-23T13:52:48+5:302024-03-23T13:53:06+5:30

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि. २७) होणार आहे. सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे दरवर्षी दोन ते तीन लाखांपर्यंत वारकरी व भाविक हजेरी लावतात...

Pathariwales, hawkers 'banned' in Tukaram Maharaj seed ceremony; Orders of the Commissioner of Police | तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’; पोलिस आयुक्तांचे आदेश

तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’; पोलिस आयुक्तांचे आदेश

पिंपरी : देहूगाव येथे बीज सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी व भाविक येतात. त्यामुळे यंदा या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडू प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार देहू येथे सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव फेरीवाले, पथारीवाले, पानटपऱ्या यांना बसण्यास व फिरण्यास प्रतिबंध केला आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि. २७) होणार आहे. सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे दरवर्षी दोन ते तीन लाखांपर्यंत वारकरी व भाविक हजेरी लावतात. देहू येथील मंदिर व मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. सोहळ्या दरम्यान संत तुकाराम महाराज मंदिर व मंदिर परिसरात फळे-फुले विक्रेते, खेळणी विक्रेते व इतर विक्रेते व व्यावसायिक हातगाडी लावून तसेच फिरून विक्री करतात. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या भाविक व वारकरी यांना पथारीवाल्यांचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. 

पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने देहुगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, देहुगाव मुख्य कमान ते १४ टाळकरी कमान या रस्त्यावर तसेच मुख्य मंदिरा समोरील रस्ता ते १४ टाळकरी कमान ते वैकुंठ मंदिर रस्ता, भैरवनाथ चौक या परिसरात मंगळवारी (दि. २६) रात्री १२ ते बुधवारी (दि. २७) रात्री बारा या कालावधीत सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव फेरीवाले, पथारीवाले, पानटपऱ्या यांना बसण्यास व फिरण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.    

Web Title: Pathariwales, hawkers 'banned' in Tukaram Maharaj seed ceremony; Orders of the Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.