पैशाच्या हव्यासापोटी मालकाचा खून; दोन लाख रुपयांची उकळली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 02:04 AM2018-09-16T02:04:49+5:302018-09-16T02:05:04+5:30

खुटबाव येथील युवक बेपत्ता झाल्याच्या घटनेचा उलगडा; जेसीबीचालकाचे कृत्य

Owner's blood money; Two lakh rupees boiled ransom | पैशाच्या हव्यासापोटी मालकाचा खून; दोन लाख रुपयांची उकळली खंडणी

पैशाच्या हव्यासापोटी मालकाचा खून; दोन लाख रुपयांची उकळली खंडणी

Next

यवत : जेसीबीवरील चालकाने पैशांच्या हव्यासापोटी मालकाचा खून केल्याची घटना समोर आली असून यामुळे मागील दहा दिवसांपासून खुटबाव (ता. दौंड) येथील युवक बेपत्ता झाल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे.
खुटबाव (ता. दौंड) येथील हनुमंत निवृत्ती थोरात या युवकाचा पैशासाठी खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.
अटक आरोपींपैकी एक आरोपी थोरात यांच्याकडेच जेसीबीचालक म्हणून काम करीत होता. पोलिसांनी याप्रकरणी सूरज ऊर्फ पप्पू सुभाष ओहोळ (वय २८, हल्ली रा. सी-२, फ्लॅट नं. ३, आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) रावसाहेब साहेबराव फुलमाळी (वय ३०, सध्या रा. जुना एसटी स्टॅन्ड, पेडगाव, ता. श्रीगोंदा, ता. अहमदनगर, मूळ रा. घोडेगाव, चांदा, ता. नेवासा, जि. अहमदनगर) छकुली सूरज ऊर्फ पप्पू ओहोळ (वय २३, सध्या रा. सी-२, फ्लॅट नं. ३, आनंदग्राम सोसायटी, वाखारी, ता. दौंड, जि. पुणे, मूळ रा. पिसोरेखांड, ता. दौंड, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे. बापू भोईटे, रा. श्रीगोंदा, ता. अहमदनगर) पूर्ण नाव पत्ता माहीत नाही. हा आरोपी अद्याप फरार आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार : खुटबाव येथील गुºहाळ व्यावसायिक हनुमंत निवृत्ती थोरात (वय ४५, रा. खुटबाव, ता. दौंड) दि. ५ सप्टेंबर २०१८ पासून गायब असल्याने त्यांच्या शोधासाठी यवत पोलिसांनी एक पथक तयार करून अत्यंत बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली होती. त्यांना हडपसर येथे हनुमंत थोरात यांची गाडी असल्याचे समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन वरील गाडी ताब्यात घेतली. गायब हनुमंत थोरात यांच्या जेसीबी मशिनवर असणारा ड्रायव्हर सूरज ऊर्फ पप्पू सुभाष ओहोळ याचा संशय वाटल्याने तो पोलिसांनी राशीन, अहमदनगर येथे येणार असल्याचे समजले. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस नाईक संदीप कदम, गणेश पोटे, सुरेश दडस, सीमा आबनावे यांनी तीन दिवस राशीन अहमदनगर येथे थांबून पप्पू ओहोळ यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाकया दाखवताच त्याने तोंड उघडले. मित्र रावसाहेब फुलमाळी, बापू भोईटे असे आमच्या तिघांवर खूप कर्ज झाले असल्याने आम्हाला पैशांची खूप गरज होती, ठरलेल्या कटाप्रमाणे तिघांनी दि. ५ सप्टेंबर रोजी थोरात यांचे वाखारी, आनंदग्राम सोसायटी येथून त्यांच्या गाडीसह अपहरण केले, त्यांचे तोंड, हात-पाय बांधून त्यांच्याकडून २ लाख रुपये घेऊन त्यांचा खून करून त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी दि. ६ सप्टेंबर २०१८ रोजी पहाटे पाटस येथील नवा मुठा उजवा कालवा येथे पाण्यात टाकून दिला व गाडी हडपसर मंत्री मार्केट येथे लावून पळून गेलो.
आज दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळीच पोलीस स्टाफ व हनुमंत थोरात यांचे नातेवाईक सर्वांनी मिळून हनुमंत थोरात यांचा मृतदेह शोधण्यासाठी पाटस येथील नवा मुठा उजवा कालव्याच्या कडेने शोध घेत असता शिर्सुफळ, बारामती, तलावाच्या कडेला कॅनॉलमधे एक व्यक्तीचा मृतदेह दिसला. मृताच्या नातेवाईकांनी तो पाहताच ते हनुमंत थोरात असल्याचे ओळखले. थोरात यांचा मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पुण्यात पाठविण्यात आला.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर करीत आहेत. तसेच आरोपींना पकडण्यासाठी सहायक फौजदार जिजाराम वाजे, रमाकांत गवळी, पोलीस नाईक संदीप कदम, गणेश पोटे, सुरेश दडस, दीपक पालखे, गणेश झरेकर, अभिजित कांबळे, महेश बनकर, रणजित निकम, दशरथ बनसोडे, सीमा आबनावे
पोलीस कॉन्स्टेबल संपत खबाले, विनोद रासकर, विशाल गजरे, हेमंत कुंजीर, प्रशांत कर्णावर यांनी मदत केली.

बटणावरून लावला शोध
या प्रकरणातील हनुमंत थोरात यांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते, पण यात काहीच धागादोरा हाती लागत नव्हता. थोरात यांची गाडी हडपसर परिसरात सापडली. त्यावेळी या गाडीत डिकीमध्ये एक शर्टचे बटण आढळून आले.
केवळ या बटणाच्या आधारावर पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व सहायक पोलीस निरीक्षक विनायक देवकर व त्यांच्या पथकाने शोध घेत आरोपींचा छडा लावला.

Web Title: Owner's blood money; Two lakh rupees boiled ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.